IND vs PAK: नो हँडशेक पॉलिसी कायम! टॉसच्या वेळी हरमनप्रीत कौरने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन टाळलं
महिला टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 women’s World Cup 2026) मधील सहावा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर रंगला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची नेहमीच दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. या सामन्यापूर्वी सर्वांना एकच प्रश्न पडला होता की, टॉसच्या वेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन (हँडशेक) करेल का? हरमनप्रीतने आपली ‘नो हँडशेक पॉलिसी’ कायम ठेवत पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सनाशी हात मिळवण्यास नकार दिला.
टॉस जिंकल्यावर हरमनप्रीत कौर म्हणाली, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, कारण ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम आहे. आम्हाला बोर्डवर मोठी धावसंख्या उभी करायची आहे. आमचा संघ पूर्ण उत्साहात आहे आणि मागील विश्वचषकातील आत्मविश्वासासह आम्ही मैदानात उतरत आहोत. आमचे पूर्ण लक्ष केवळ चांगला खेळ करण्यावर आहे. आजच्या सामन्यात आमचा संघ तीन फिरकी गोलंदाज आणि दोन मध्यमगती गोलंदाजांसह खेळत आहे.
पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन!
भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्नाधर), भारती फुलमाली, ऋचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड.
सामन्यापूर्वी हँडशेकबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरमनप्रीत म्हणाली की, आमचे संपूर्ण लक्ष केवळ आपल्या खेळावर आहे आणि आम्ही संघात क्रिकेटशिवाय इतर कोणत्याही गोष्टीवर चर्चा करत नाही. हरमनप्रीत पुढे म्हणाली, “एक चाहता म्हणून जेव्हा मी क्रिकेट पाहायला सुरुवात केली, तेव्हापासूनच मला या सामन्याचा दबाव जाणवायचा. आता मी स्वतः खेळत असल्यामुळे हा दबाव अधिक आहे. पण आम्ही खेळाडू आपापसात हेच बोलतो की, सामन्याचा आनंद घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. शेवटी, हा सुद्धा एक सामान्य सामनाच आहे.
Comments are closed.