भारताच्या पोरींनी मैदान मारलं! स्मृती अन् दीप्तीच्या पराक्रमापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे; टी-2
भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला ICC महिला T20 विश्वचषक 2026 : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने 64 धावांनी मोठा विजय नोंदवला. महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानला पराभूत करण्याची ही नववी वेळ आहे. भारताने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या 106 धावांवर आटोपला.
काय. A. समाप्त 🥳
एका षटकात 3️⃣ विकेट आणि दीप्ती शर्माने शानदार 𝙁𝙄𝙁𝙀𝙍 🖐️#TeamIndia प्रबळ 6️⃣4️⃣-धावांनी विजय मिळवून आमचा किकऑफ करा #T20WorldCup मोहीम 👏
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/1tfRc3jcrX#WomenInBlue | #T20WorldCup pic.twitter.com/vhvCoE9tXu
— BCCI महिला (@BCCIWomen) 14 जून 2026
स्मृती मानधनाचे वादळी अर्धशतक, भारताचे 170 धावांचे आव्हान
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय योग्य ठरला. सलामीवीर स्मृती मानधनाने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत 44 चेंडूंत 68 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 9 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकले. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरची चांगली साथ मिळाली, जिने 35 चेंडूंत 4 चौकारांसह 36 धावा केल्या.
त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषने अवघ्या 17 चेंडूंत 34 धावांची (5 चौकार, 1 षटकार) स्फोटक खेळी करत भारताला 6 बाद 170 धावांचा पल्ला गाठून दिला. दीप्ती शर्मा 12 धावांवर नाबाद राहिली. पाकिस्तानकडून कर्णधार फातिमा सना आणि सादिया इक्बाल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
दीप्ती शर्माचा फिरकीची जादू
171 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. अष्टपैलू दीप्ती शर्माने पाकिस्तानला सुरुवातीचे धक्के दिले. तिने गुल फिरोजा (12) आणि आयशा जफर (12) यांना बाद करत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. यानंतर भारताच्या अचूक क्षेत्ररक्षणामुळे फॉर्मात असलेली मुनिबा अली (41 धावा) दीप्ती शर्माच्या थेट थ्रोवर धावचीत (Run Out) झाली आणि पाकिस्तानची मोठी आशा मावळली.
दुसऱ्या बाजूने श्री चरिणीने चांगली गोलंदाजी करत सायरा जबीन (2), नतालिया परवेझ (13) आणि रमीन शमीम (4) यांना बाद केले. कर्णधार फातिमा सना तर खातेही उघडू शकली नाही, तिला शफाली वर्माने बाद केले. पाकिस्तानने अवघ्या 79 धावांवर आपले 6 महत्त्वाचे गडी गमावले होते. अखेर १७ व्या षटकात 106 धावांवर पाकिस्तानचा संपूर्ण संघ गारद झाला.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.