लंडनमध्ये भारतीय तरुणाची हत्या
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये एका भारतीय युवकाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. ही घटना पश्चिम लंडनच्या साउथहॉलमध्ये घडली आहे. नॉर्थ रोड परिसरात 26 वर्षीय गुरभेज सिंह याच्यावर चाकूने वार करण्यात आले. याचबरोबर आणखी एका इसमावर हल्ला झाला होता, परंतु त्याला गंभीर ईजा झाली नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही गुरभेज सिंहचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सिंहच्या परिवाराला अधिकाऱ्यांकडून सहाय्य करण्यात येत आहे. सिंहच्या हत्येप्रकरणी कमीतकमी 7 जणांना संशयाच्या आधारावर पकडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हत्येशी निगडित परिस्थितींचा तपास केला जात असल्याचे स्पेशलिस्ट क्राइम कमांडच्या डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर एलिसन फॉक्सवेल यांनी सांगितले आहे. अधिकारी साक्षीदारांचा शोध घेत परिसरातून पुराव्यांची समीक्षा करत आहे. घटनेच्या पूर्ण चौकशीनंतरच गोष्टी स्पष्ट होतील असे पोलिसांनी सांगितले आहे. ब्रिटनच्या काही हिस्स्यामंध्ये इमिग्रेशन अन् सार्वजनिक सुरक्षा वादग्रस्त मुद्दा ठरला असताना लंडनमध्ये भारतीय युवकाची हत्या झाली आहे.
Comments are closed.