उत्तराखंडमध्ये हिंदू तरुणाची हत्या
जमावाने आरोपीचे घर पेटविले : प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई
वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडची राजधानी देहरादूनच्या सहसपूर भागातील बैरागीवाला गावात पाण्यावरून झालेल्या वादात हिंदू युवकाची हत्या करण्यात आली. यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले आहे. संतप्त जमावाने यानंतर आरोपीच्या घरावर हल्ला केला आहे. मृत युवकाचे नाव विनोद (43 वर्षे) हेते आणि तो भाजपचा कार्यकर्ता होता. तर तणाव पाहता प्रशासनाने तेथील इंटरनेट सेवा रोखली आहे.
हत्येच्या घटनेमुळे संतप्त जमावाने आरोपीच्या घराला पेटवून दिले आहे. तसेच आरोपींच्या घरांवर दगडफेकही केली. तर आरोपीच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर चालविला आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी हे विशेष समुदायाचे होते असे सांगण्यात येत आहे.
तणाव पाहता पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत स्थिती सांभाळली. याचबरोबर 3 फरार तसेच 25 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. परिसरात पोलीस तैनात करण्यात आले असून स्थितीवर नजर ठेवली जात आहे.
गावात सरकारी ट्यूबवेलमधी पाणी मिळविण्यावरून विनोद, राजेश आणि अशोक यांचे माजी सरपंच इस्तिपाक यांचा पुतण्या इम्तियाजसोबत भांडण झाले होते. यानंतर रज्जाक, अमन, युनूस, अनीस समवेत 20-25 जणांच्या जमावाने तेथे जात धारदार अस्त्र अन् हातोड्यांनी तिन्ही भावांवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात विनोदचा मृत्यू झाला. तर त्याच्या परिवारातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले.
भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच हिंदुत्ववादी संघटनांनी कारवाईची मागणी करत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. यादरम्यान पोलिसांसाठी संतप्त जमावाला शांत करणे आव्हानात्मक ठरले होते.
Comments are closed.