शिवसेनेचे प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या; एकनाथ शिंदेंचा शंभूराज देसाईंना आदेश
सातारा : राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीतील भाजप आणि शिवसेनेतील वादावर अखेर पडदा पडल्याचं दिसून येतंय. शिंदेंच्या शिवसेनेचे मतदार हे आता भाजपच्या उमेदवारालाच मतदान करणार आहेत. शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये, प्रत्येक मत हे महायुतीच्या धैर्यशील कदम यांनाच पडलं पाहिजे, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिल्याची माहिती आहे.
सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे धैर्यशील कदम आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांच्यामध्ये लढत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
Satara Sangli Vidhan Parishad : भाजप-शिवसेनेमध्ये वाद
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही भाजपचा उमेदवार निवडून आला होता. भाजपने दोन्ही मित्रपक्षांची काही मते फोडून ही किमया केली होती. या दरम्यान झालेल्या राड्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्याशी पोलिसांची झटापट झाली होती.
या घटनेनंतर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई हे नाराज झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा वचपा शिवसेना आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काढणार अशी चर्चा सुरू होती. ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानतंर त्यांनी धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली. असं असलं तरी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मात्र त्यांची भूमिका स्पष्ट केली नव्हती.
Maharashtra Vidhan Parishad Election : एकनाथ शिंदेंचा अंतिम निर्णय
दरम्यानच्या काळात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या मतदारांची बैठक बोलावली आणि त्यांची मतं जाणून घेतली. त्यानंतर त्याचा अहवाल हा त्यांचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला. एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो अंतिम असेल असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेची भूमिका संभ्रमावस्थेत असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची काही प्रमाणात धाकधूक वाढल्याचं चित्र होतं. आता मात्र एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांच्याकडे निरोप पाठवला आहे.
सातारा–सांगली विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचे मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडले पाहिजे. शिवसेनेचे एकही मत फुटता कामा नये, असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा:
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Comments are closed.