बिहारमध्ये मदरसा प्रशासकाला अटक.
मध्यप्रदेश एटीएसची कारवाई : ‘कट्टरवादी मॉड्यूल’चा सर्वात जुना सदस्य
वृत्तसंस्था, भोपाळ
मध्यप्रदेश एटीएसने एका आंतरराज्य कट्टरवादी मॉड्यूलप्रकरणी बिहारमधील मदरसा संचालकाला अटक केली आहे. याचबरोबर याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारच्या मधुबनी येथून 56 वर्षीय इजहार उल हक याला बिहार एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.
इजहारला मधुबनी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि त्याला ट्रान्झिट रिमांडवर मध्यप्रदेशात नेण्यात येणार आहे. आरोपी बुधवारी मध्यप्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. कट्टरवादी मॉड्यूलचा इजहार हा म्होरक्या असू शकतो असे मानले जात आहे.
पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात
सर्व आरोपी एक क्लोज्ड ऑनलाइन ग्रूपचा हिस्सा होते, जो पाकिस्तान स्थित एक ‘हँडलर’ एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे नियंत्रित करत होता. भारतात लोकांना कट्टरवादी करणे आणि दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी विदश्sशी म्होरक्यांकडून ऑनलाइन ग्रूपचा वापर होत असल्याचा खुलासा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले होते.
भोपाळमध्ये एका खासगी क्लीनिकमध्ये काम करणारा फराज नेटवर्कच्या सदस्यांच्या संपर्कात होता आणि ऑनलाइन चॅनेल्समुळे प्रभावित झाला होता. फराज अन् कुरैशी, शाकिरची एटीएस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थानात कारवाई
याप्रकरणी पहिली अटक शुक्रवारी झाली होती, मध्यप्रदेश एटीएसने भोपाळचा रहिवासी 35 वर्षीय मोहम्मद फराजला ताब्यात घेतले होते. यानंतर एटीएसने उत्तरप्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातून 38 वर्षीय नईम अब्दुल्ला कुरैशी तर राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातून 34 वर्षीय मोहम्मद शाकिर याला अटक केली होती.
Comments are closed.