उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला
रामदास कदम : एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार फोडून बहुचर्चित ऑपरेशन टायगर (Operation Tiger) अखेर यशस्वी केल्याची चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांनी बुधवारी नवी दिल्लीतील लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा अध्यक्षांनी या सहा बंडखोरांच्या गटाला मंजुरी दिल्याचेही समजते. अशातच यावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत आणि भासक्र जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ही वेळ का आली, याबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं. आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार, असा टोलाही रामदास कदमांनी लगावला. तसेच भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का? त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान रामदास कदमांनी दिले.
ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य निर्णयावर तांत्रिक अडचण येणार नाही
आमदार, मंत्री आणि आता खासदारही पक्ष सोडत असल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. सर्वांना चालते व्हा म्हणण्याने मराठी माणसाचे नुकसान होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. लहान तोंडी मोठा घास घेतोय, म्हणत उद्धव ठाकरेंवर बोचरी टिप्पणी रामदास कदमांनी केली. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य निर्णयावर तांत्रिक अडचण येणार नाही असा दावा कदमांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांना कायदेशीर आणि प्रशासकीय कामाचा अनुभव नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
नैतिकता असेल तर संजय राऊतांनी राजीनामा का दिला नाही?
संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, चाळीस आमदारांच्या जीवावर संजय राऊत खासदार झाले. नैतिकता असेल तर राजीनामा का दिला नाही? असा सवाल राऊतांनी केला. जगा सांगे ब्रह्मज्ञान…म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका केली. भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का? त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान रामदास कदमांनी दिले. ये दिन कट जायेंगे… देखो आगे क्या होता है…म्हणत भास्कर जाधवांना इशारा दिला आहे. ठाकरे गटात आणखी राजकीय घडामोडी होण्याचे संकेत मिळत आहेत.
कुठलंही ऑपरेशन सक्सेस झालं नाही, अरविंद सावंतांचा दावा
ऑपरेशन टायगर पूर्ण झालं की नाही याबाबत अद्यापही दोन्ही पक्षाकडून भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय, ठाकरेंचे खासदारही माध्यमांपुढे येऊ आपली भूमिका मांडताना दिसत नाही. त्यातच, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप बजावला असून उद्या खासदारांची बैठक असल्याची माहिती दिली होती. तसेच, आता राडा होईल म्हणत फुटणाऱ्या खासदारांना संजय राऊत यांनी थेट इशारा देखील दिला होता. आता, खासदार अरविंद सावंत यांनी कुठलंही ऑपरेशन सक्सेस झालं नाही, सर्वच खासदार आमच्यासोबत असल्याचं म्हटलं. तर, दुसरीकडे आज झालेले ऑपरेशन टाइगर फुल प्रूफ झालं असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे.
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Comments are closed.