आकांक्षा रंजन थाटनार संसार – तरुण भारत
दिग्दर्शकासोबत आहे रिलेशनशिपमध्ये
मोनिका ओ माय डार्लिंग यासारखे चित्रपट अन् ग्राम चिकित्सालय या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांची मने जिंकणारी आकांक्षा रंजन कपूर ही अभिनेत्री आलिया भट्टची घनिष्ठ मैत्रिण आहे. वर्तमान काळात आकांक्षा स्वत:च्या रिलेशनशिपवरून चर्चेत आहे. आकांक्षा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. स्वत:चा लाँग टाइम बॉयफ्रेंड आणि प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत ती वेडिंग प्लॅन करत आहे.
आकांक्षा ही शरण शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. शरण शर्माला ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटांसाठी ओळखले जाते. आकांक्षा अन् शरण 11 जुलै रोजी विवाहबद्ध होणार आहेत. आकांक्षा अन् शरणच्या विवाहसोहळ्यात जवळचे मित्र अन् कुटुंबीयच सामील होतील.
आकांक्षाने 2022 मध्ये शरणला डेट करण्यास सुरुवात केली होती. दोघांनी स्वत:चे हे नाते दीर्घकाळ उघड केले नव्हते. आकांक्षाने अलिकडेच स्वत:च्या रिलेशिनशिपची वाच्यता केली होती. आकांक्षा लवकरच ग्राम चिकित्सालय सीझन 2 मध्ये दिसून येणार आहे.
Comments are closed.