गरीबांच्या धान्यावर डल्ला, एक टन धान्य काळ्या बाजारात विकताना रेशन दुकानावर धाड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गरीबांच्या रेशन धान्यावर डल्ला मारण्याचा संतापजनक प्रकार वसईमध्ये उघड झाला आहे. पुरवठा विभागाच्या पथकाने सोमवारी वसईतील धान्य दुकानावर धाड टाकून एक टनहून जास्त धान्य काळ्या बाजारात विकताना पकडले. वसई पश्चिम झेंडा बाजार परिसरात असलेल्या शिधावाटप केंद्रावर एका व्यापाऱ्याकडून हे धान्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पुरवठा विभागाच्या माध्यमातून वसई, विरारमध्ये शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. या धान्याचे वितरण करण्यासाठी वसईत 180 शिधावाटप केंद्रे आहेत. या केंद्रातून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा साडेपाच लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले जाते. मात्र काही शिधापत्रिकाधारक शिधा वाटप केंद्रातून स्वस्तात धान्य घेऊन नंतर ते बाहेरील व्यक्तींना चढ्या भावाने विक्री करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. वसई पश्चिम झेंडा बाजार परिसरात असलेल्या एका शिधावाटप केंद्रावर शिधापत्रिकाधारक धान्य घेऊन खासगी व्यापाऱ्याला विक्री करत असल्याची तक्रार पुरवठा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी धाड टाकून धान्याचा सुरू असलेला काळा बाजार उघड केला. या कारवाईत 450 किलो तांदूळ व 650 किलो गहू असा 1100 किलो धान्यसाठा जप्त केला असल्याची माहिती पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी दिली.

Comments are closed.