‘सगळं संपलं, हा माझा शेवटचा व्हिडीओ ठरु शकतो…’; प्रसाद वेदपाठक रडत-हात जोडत काय काय म्हणाला?
प्रसाद वेदपाठक व्हाईट लाईन विवाद शेअर करा व्हिडिओ: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer), युट्यूबर प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) यानं काही दिवसांपूर्वी त्याच्या सोसायटीत मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा (Jain White Line Controversy) मुद्दा उपस्थित करत आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा केलेला. त्यानंतर ज्या जैन कुटुंबीयांनी पांढरी पट्टी मारलेली, त्यांनी ती हटवली. त्यानंतर प्रसाद वेदपाठक यानं “माझ्यासाठी हा विषय संपला…”, अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. पण, त्यानंतरच खऱ्या अर्थानं या प्रकरणाला धार्मिक आणि राजकीय रंग चढला. मनसेनं प्रसाद वेदपाठकला पाठींबा दिला. मुळात घाटकोपरमधल्या एका सोसायटीमधून सुरू झालेला हा मुद्दा अख्ख्या मुंबईभर चिघळला आणि मराठी विरुद्ध जैन हा वाद उफाळला. अशातच आता प्रसाद वेदपाठक यानं त्याच्या सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये त्यानं त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातायत, त्याच्यासोबत काहीही होऊ शकतं, त्याचं काहीही बरं-वाईट होऊ शकतं, असं म्हटलंय.
प्रसाद वेदपाठक यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो काहीसा भावूक झालाय. तसेच, आपल्याला मदतीची गरज आहे, असंही तो म्हणालाय. तसेच, प्रसाद वेदपाठक यानं मुख्यमंत्र्यांनाही साकडं घातलंय. त्यासोबतच कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ असेल, मला नाही माहीत, पुढे काय होणार आहे? अशी काळजीसुद्धा व्यक्त केलीय. त्यासोबतच ज्यांनी रेघ मारली तो चुकीचा की, जो आवाज उठवतोय तो चुकीचा…? असंही प्रसाद वेदपाठक म्हणालाय.
प्रसाद वेदपाठक शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला?
प्रसाद वेदपाठक म्हणालाय की, “नमस्कार, मंडळी आमच्या सोसायटीमध्ये जो पांढऱ्या पट्टीचा वाद झालाय, त्यानंतर पूर्ण आयु्ष्य आमचं बदललंय. 4 तारखेला वाद झाला, 8 तारखेला त्यांना आम्ही भेटलो, 9 तारखेला ती पट्टी ज्यांनी मारलेली त्यांनी हटवली… त्यानंतर 11 तारखेला आमच्या इथले नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पोलिसांना एक लेटर दिलं आणि माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली… या सर्व घडामोडींमध्ये बरीच लोक आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत… पाठलाग केला जातोय, घरी माणसंही आलेली, आमच्यावर दबाव आणण्यासाठी, धमकावण्यासाठी… या सर्व गोष्टींचे साक्षीदार माझे आई-वडील, माझे सासरे, माझा भाऊ, माझी बायको दीपिका हे आहेत…
“मी तुम्हाला आता हे सर्व सांगतोय कारण मला माहीत नाही की, माझं काय होईल पुढे…. माझ्यावर सर्व बाजूंनी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, मला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय… मला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट किंवा असं काही मिळत नाहीये, फक्त मनसेनंच मला पूर्ण पाठिंबा दिलाय. राजसाहेब, अविनाश दादा, संदीप सर… प्लीज जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, यांनी मला अडकवलं, तुम्हाला सगळं खरं, सत्य माहितीये, हा वाद पांढऱ्या पट्टीपासून सुरू झाला आणि आता याला भलतीच दिशा दिली जातेय… माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकतो…”, असं प्रसाद वेदपाठक यानं म्हटलंय.
पुढे बोलताना प्रसाद वेदपाठक म्हणालाय की, “मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करतोय की, प्लीज सर हे खूपच चुकीचं सुरूये, प्लीज माझ्याबाबत जाणून घ्या, मी काय आहे, मी कसे माझे फॉलोअर्स कमावलेत, माझे लोक मला काय मानतात, मी देशासाठी काय करतोय, प्लीज हे जाणून घ्या. कारण या गोष्टींची पूर्ण तपासणी करा. कारण बऱ्याच लोकांची मनं दुखलीत, बऱ्याच खोट्या गोष्टी माझ्याविरोधात स्प्रेड केल्या गेल्यात, अशा गोष्टी ज्या मी बोललोच नाहीय, त्यामुळे एक निगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झालंय, सगळे नुसते माझ्या जीवावर उठलेत, त्यामुळे मी एक अपील करतोय की, माझा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, माझा माणुसकीवर पूर्ण विश्वास आहे, माझा माझ्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे, पण त्यासोबतच एक यंत्रणा माझ्या पूर्णपणे मागे लागलीय, कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ असेल, मला नाही माहीत, पुढे काय होणार आहे ते, मला माझे कॉन्टॅक्ट्स आहे, त्यांच्याकडून कळलंय की, माझ्याविरोधात आधीच गुन्हा दाखल झालाय, तो भलत्याच व्यक्तीनं भलत्याच संदर्भात केलाय, त्या जिहादी वैगरे शब्दही टाकले गेलेत, जे शब्द आलेले प्रवीण छेडाच्या तोंडून…”
“प्लीज हे सगळं नका करू तुम्ही, आमच्याच जमिनीवर आम्हाला दाबलं, मी त्याच्याविरोधात आवाज उठवला, आता पूर्णपणे मला त्रास दिला जातोय, I don’t deserve this… We deserve Justis… प्लीज आम्हाला मदत करा… अकाउंट सस्पेंड केले जातात, मास रिपोर्टटिंग केली जातेय, मी सगळ्यांकडून मदतीची याचना करतोय, आता या क्षणी आम्हाला फक्त मदतीची गरज आहे, खूप चुकीचं होतंय, मला माझ्या कुटुंबाची चिंता आहे, मी माझ्या कुटुंबाचा मुख्य माणूस आहे, यांनी मला जर अटक केली, तर सगळं उध्वस्त होईल… मी कर्ता आहे घराचा आणि मी कधीच आयुष्यात चुकीचं काम केलेलं नाही, मी चुकीची कामं नाही करू शकत, खोट्या FIR, खोट्या NC नाही करू शकत… प्लीज समजून घ्या… ज्यांनी रेघ मारली तो चुकीचा की, जो आवाज उठवतोय तो चुकीचा…? एवढी साधी गोष्ट आहे…”, असं प्रसाद वेदपाठक म्हणालाय.
पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका आहे तरी काय? (Prasad Vedpathak Controversy)
कंटेट क्रिएटर आणि यूट्यूबर प्रसाद वेदपाठकनं जैन धर्मगुरुंसाठी घाटकोपरमधील ‘कैलास अव्हेन्यू’ सोसायटीच्या आवारात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा विरोध केला होता. प्रसादच्या म्हणण्यानुसार, सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता त्यांनी ही पांढरी पट्टी मारली होती. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा त्यानं आपल्या व्हिडीओतून केला. प्रसादनं या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठवला. तसेच व्हिडीओच्या माध्यमातून याची माहिती दिली. वाढत्या वादानंतर ती पांढरी पट्टी काढण्यात आली. दरम्यान, या प्रकरणानंतर त्याला धमक्या मिळत असल्याचं त्यानं सांगितलं. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं ट्वीट केलं होतं. हे प्रकरण इतकं व्हायरल झालं की, थेट मनसे दरबारी पोहोचलं. त्यानंतर या प्रकरणी प्रसाद वेदपाठकवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
एबीपी माझाची बातमी LIVE
अर्जुन तेंडुलकर वेड्स सानिया चंधोक : अर्जुन-सानिया लग्नबंधात! स्टायलिश लुकिंग चष्म्यासह लक्ष्य ठेवा
Comments are closed.