संजय दिना पाटलांनी खोटारडेपणाची हद्द गाठली, ईशान्य मुंबईपासून दिल्लीपर्यंत खोटं बोलून फुटले

संजय दिना पाटील मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार पक्षाची साथ सोडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून व्हीप बजावून बोलावण्यात आलेल्या बैठकीला या खासदारांनी दांडी मारली आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांपैकी संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.या खासदारांपैकी माध्यमांच्या संपर्कात केवळ संजय दिना पाटील  होते. संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत. काल त्यांनी पक्षाच्या दिल्लीतील बैठकीला जाणार असल्याचं म्हटलं होतं, मात्र ते अजूनपर्यंत दिल्लीत पक्षाच्या बैठकीसाठी पोहोचले नाहीत, त्यामुळं त्यांनी माध्यमांशी बोलताना खोटेपणा केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

संजय दिना पाटील काय म्हणाले होते?

खासदार संजय दिना पाटील यांनी काल एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना पत्रावर सही केली नसल्याचं म्हटलं होतं. पक्षाच्या बैठकीला जाणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आज संजय दिना पाटील ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीला ते अजूनपर्यंत उपस्थित राहिले नाहीत.

संजय दिना पाटील काल काय म्हणाले?

खासदार संजय दिना पाटील यांच्याशी काल एबीपीच्या प्रतिनिधींनी फोनवरून चर्चा केली, त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्याला जायचं ते जातील…जे जाणार ते तुम्हाला दिसतील… आम्हाला हैराण करू नका. संजय राऊत अरविंद सावंत हे आमचे नेते आहेत, ते यावर बोलतील, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, यावेळी संजय दिना पाटील यांनी एक प्रकारे संताप व्यक्त केलेला होता.

मातोश्री वरील बैठकीला उशिरानं दाखल

रविवारी 14 मार्चला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे उपस्थित होते. त्यानंतर बैठक संपण्याच्या वेळी संजय दिना पाटील उशिरानं दाखल झाले होते. संजय दिना पाटील यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती देखील त्यावेळी समोर आली होती. मात्र,संजय दिना पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्या प्रश्नांची उत्तरं देताना ते संतापलेले पाहायला मिळाले होते.

ठाकरेंचे कोणते खासदार फुटण्याच्या मार्गावर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार?

1. अरविंद सावंत

2. अनिल देसाई

3. राजाभाऊ वाजे

हेदेखील वाचा

Comments are closed.