VIDEO: ईशान किशनचा शुबमन गिलवर गंभीर आरोप! म्हणाला, “6 षटकार मारण्याच्या नादात माझ्या 70 धावा कमी…”
बुधवारी (१७ जून) लखनऊमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. यामध्ये गिल-किशन नावाच्या वादळाने अफगाणिस्तानला चांगलेच झोडपले. या सामन्यात ईशान किशनने धमाकेदार शतकी खेळी केली. तो वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक द्विशतक झळकावू शकला असा, मात्र शुबमन गिलमुळे ते शक्य झाले नाही. ‘गिलमुळे मी ७० धावा कमी केल्या’, असा आरोप किशनने गिलवर केला आहे. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये किशनने हा आरोप केला आहे.
एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात किशनने ७९ चेंडूंत १२५ धावा केल्या. दुसरीकडे गिलनेही दीडशतकी खेळी केली. तो ११० चेंडूंत १५४ धावा करत बाद झाला. वनडे क्रिकेटमध्ये दोघांच्याही नावावर प्रत्येकी एक-एक द्विशतक आहे. या सामन्यातही दोघांना आणखी एक द्विशतक करण्याची संधी होती. किशन जेव्हा बाद झाला तेव्हा ३७ वे षटक सुरू होते. यामुळे उर्वरित १३ षटकांमध्ये ते २०० पर्यंत पोहोचू शकले असते. किशनने ३७ व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारले आणि तिसरा चेंडू सीमारेषेपार पाठवण्याच्या प्रयत्नात बाद झाला. याबद्दल किशनने म्हटले की, गिलला त्याच्याकडून सहा षटकारांची अपेक्षा होती.
बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये किशन गंमतीने म्हणाला, “गिलने ६ षटकार मारण्याच्या प्रयत्नात माजी धावसंख्या ७० धावांनी कमी केली.” त्यावर गिलचे प्रतुत्तर, “ज्या चेंडूवर तू आऊट झाला, तो चेंडू तुला मारायचाच होता.”
गिल पुढे असेही म्हणाला, “मधल्या ५-६ षटकांपर्यंत स्ट्राईक न देण्याची किशनची योजना होता. मी ५ चेंडू मारेन आणि सहाव्या चेंडूवर एक धाव घेऊन पुन्हा खेळेन.” यावर किशन म्हणाला, ” हे २-३ षटकापर्यंत घडले, मात्र ते फिरकी गोलंदाजांवर संधी घेण्याबद्दल होते.
किशन त्याच्या खेळीबद्दल म्हणाला, “खरं सांगायचे तर मी खेळ सोपा ठेवत होतो आणि गिल फलंदाजी करत असताना एक चांगली भागीदारी करण्याची योजना होता. त्याने मला केवळ फलंदाजी करत राहण्यास सांगितले, कारण मला वाटले की खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती आणि आम्हाला माहित होते की जेव्हा अधिका धाव करण्याची वेळ येईल तेव्हा गोलंदाजांवर हल्ले करत आम्ही ते करू. त्यामुळे चांगले शॉट्स खेळण्याची योजना होती.”
पुढे किशनने गिलचे कौतुकही केले आहे. तो म्हणाला, “सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्णधारावर विश्वा ठेवावा लागतो. काही वेळा मी घाई करत होतो आणि चौकार मारण्याच्या प्रयत्नात होतो, त्यावेळी त्याने मला शांत राहण्यास सांगितले. धावा कशा करायच्या आणि मोठी धावसंख्या कशी उभारायची हे त्याला चांगलाच माहित आहे.”
या सामन्यात भारताने ४९.५ षटकांत सर्व विकेट्स गमावत ४०२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ ४४.३ षटकांत २३२ धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. हा सामना जिंकताच भारताने तीन सामन्यांची ही वनडे मालिका २-० अशी जिंकली आहे. तिसरा सामना २० जूनला चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे.
Comments are closed.