ठाकरेंचे उरलेले तीन खासदारही लवकरच फुटतील, संजय राऊत काँग्रेसचे ‘दलाल’; नरेश मस्केंची टीका
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी त्यांना बजावलेला व्हिप (Whip) नाकारत संजय राऊत यांचं थोबाड फोडलं आहे, असा घणाघात म्हस्के यांनी केला. उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत शय्यासोबत करत असून केवळ काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नरेश म्हस्के यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर थेट टीका करताना त्यांना ‘काँग्रेसचे दलाल’ असं संबोधलं. त्यांचा दिवा आता विझत चालला आहे, म्हणूनच ते सध्या जास्त फडफडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
Naresh Mhaske vs Sanjay Raut : ‘संजय राऊतांचा दम फक्त तोंडात’
खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “संजय राऊत यांचा दम फक्त तोंडात आहे, पण ताकद मनगटात असावी लागते. स्वतः एकनाथ शिंदे (मराठी) यांनी सांगितल्यानंतर आमदारांनी मतं दिली, म्हणूनच संजय राऊत हे खासदार होऊ शकले. आता ठाकरे गटाकडे केवळ तीन खासदार शिल्लक राहिले आहेत. ते तरी किती काळ तुमच्या सोबत राहतात, ते आता बघाच.”
भविष्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष हा संपूर्णपणे काँग्रेसमध्ये विलिन (Merge into Congress) होणार आहे. याच भीतीमुळे आणि याच कारणामुळे त्यांच्या खासदारांनी ही बंडखोर भूमिका घेतली आहे, असा दावा नरेश मस्के यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी या खासदारांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी कधीही थेट भेट होऊ दिली नाही, असा दावाही त्यांनी केला.
Naresh Mhaske On Uddhav Thackeray : अंबादास दानवे यांच्या अर्जावर आमदारांचा आक्षेप?
ठाकरेंच्या पक्षांतर्गत वादावर बोलताना म्हस्के यांनी विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या उमेदवारी अर्जाचा उल्लेख केला. अंबादास दानवे यांच्या फॉर्मवर 10 आमदारसुद्धा सह्या करण्यासाठी तयार नव्हते. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हेदेखील त्यासाठी राजी नव्हते, असा दावा म्हस्केंनी केला.
शेवटी पुण्यात एक महत्त्वाची बैठक असल्याचं कारण सांगून त्या आमदारांना बोलावण्यात आलं आणि त्यांच्याकडून त्या फॉर्मवर सह्या घेतल्या गेल्या, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.
ही बातमी वाचा:
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
Comments are closed.