अमेरिका-इराण शांतता करारावर शिक्कामोर्तब; ट्रम्प, पेजेश्कियान यांनी केली स्वाक्षरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अवघ्या जगाला संकटात टाकणारे इराण-अमेरिकेतील युद्ध आज अखेर अधिकृतरित्या थांबले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी शांतता करारावर स्वाक्षरी केली.

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे, इराणच्या ‘पुनर्रचने’साठी 300 अब्ज डॉलर्सची (224 अब्ज पाउंड) योजना आणि अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व प्रकारचे आर्थिक निर्बंध उठवणे हे प्रमुख मुद्दे शांतता कराराचा भाग आहेत. दोन्ही देशांमध्ये वादाचा मुद्दा असलेल्या इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे काय होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. पुढील 60 दिवसांत यावर वाटाघाटी होणार आहेत. करारावर स्वाक्षरी होताच अमेरिकी नौदलाने होर्मुझभोवती लावलेली नाकेबंदी उठवली असून पहिल्याच दिवशी 12 जहाजे इराणच्या बंदराला लागली.

Comments are closed.