ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या आयपीएल ट्रेडमध्ये कोणाला फायदा-तोटा? घ्या जाणून

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दोन निराशाजनक हंगामानंतर ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाचा त्याग केला. तेव्हाच कळाले की पंत आता नव्या संघाचा शोधात आहे. २०२६ चा हंगाम संपल्यानंतर समोर आलेले पहिले ट्रेड पंतशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतची ट्रेड डील दिल्ली कॅपिटल्ससोबत होऊ शकते. पंत दिल्लीकडून आधीही खेळला आहे, त्यानंतर तो लखनऊमध्ये गेला होता.

वृत्तांनुसार, लखनऊ सुपर जायंट्सला पंतच्या बदल्यात कुलदीप यादव हवा आहे. कुलदीप देशांतर्गत स्पर्धामध्ये उत्तर प्रदेशकडून खेळतो, त्यामुळे त्याच्यासाठी हे ट्रेड म्हणजे मायदेशी परतण्यासारखे आहे. त्यामुळे या ट्रेडमध्ये कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार हे जाणून घेऊ.

१) या डीलमुळे पंतला १२ कोटी रुपयांचे नुकसान – या ट्रेड डीलमुळे भारताचा विकेटकीपर-फलंदाज पंतला सर्वात मोठे नुकसान होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स त्याला अंदाजे १५ कोटी रुपयांना संघात घेऊ इच्छित आहे. असे झाले तर पंतला १२ कोटी रुपयांचा तोटा होणार आहे.

२) लखनऊ सुपर जायंट्सला फायदा – पंतच्या ट्रेड डीलमुळे लखनऊला मोठा फायदा होणार आहे. २७ कोटी रुपयांच्या पंतच्या जाण्यामुळे त्यांच्या पर्समधील रकमेत वाढ होईल, जी लिलावावेळी कामी येईल. तसेच त्यांना कुलदीपसाठी खूपच कमी रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे ते लिलावादरम्यान नव्या खेळाडूंचा शोध घेऊ शकतो. कुलदीप १३.२५ कोटी रुपयांच्या त्याच रकमेत लखनऊमध्ये सामील होऊ शकतो.

३) पंतचे कर्णधारपद जाऊ शकते, मात्र दिल्लीमध्ये परतल्यावर त्याला आपलेपणा जाणवेल. जेव्हा पंत दिल्ली सोडून लखनऊमध्ये सामील झाला होता, त्याआधी तो दिल्लीचा कर्णधार होता. नंतर त्याने लखनऊचे नेतृत्व केले, मात्र तो पुन्हा दिल्लीमध्ये परतल्यानंतर विकेटकीपर-फलंदाज म्हणून खेळेल.

४)कुलदीप आयपीएलमध्ये दिल्लीच्याआधी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडूनही खेळला आहे. आता तो पुढील हंगामासाठी आपल्या घरच्या संघात परतल्यावर त्याला तेथील चाहत्यांचा अधिक पाठिंबा मिळेल आणि तो त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरेल.

५) दिल्ली केएल राहुलला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त करू शकते. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली संघाची मागील काही हंगाम वाईट गेले आहेत. त्यामुळे ते कदाचित नेतृत्वाच बदल करण्याची दाट शक्यता आहे. तसेच राहुलने आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि लखनऊचे नेतृत्व केले आहे.

वरील ट्रेडवरून दिल्ली आणि लखनऊ दोन्ही संघ पुढील हंगामाच्या तयारीला सुरूवात केली असल्याचे दिसत आहे.

Comments are closed.