गाईच्या तोंडातून एक खिळा काढला.
सध्या एक अद्भूत शस्त्रक्रिया सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली आहे. एका पाळीव गाईने चाऱ्यासमवेत खिळा गिळलेला खिळा पशुवैद्यांनी कसा बाहेर काढला, यासंबंधची ही शस्त्रक्रिया आहे. या गायीला चरण्यासाठी बाहेर नेण्यात आले असताना तिने चाऱ्यासमवेत एक मोठा लोखंडी खिळाही गिळला. गायीच्या मालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने तिला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी परीक्षण केल्यानंतर गायीच्या पोटात खिळा गेल्या असल्याचे उघड झाले.
आता हा खिळा काढायचा कसा हा प्रश्न होता. कारण प्राण्यांवर माणसांसारखी शस्त्रक्रिया करणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे खिळा काढण्यासाठी डॉक्टरांना काहीतरी नवी युक्ती करणे भाग होते. गायीच्या तोंडातून तिच्या पोटात एक लोहचुंबक सोडल्यास या लोहचुंबकाला खिळा चिकटेल आणि नंतर लोहचुंबक बाहेर काढल्यास त्याला चिकटलेला खिळाही बाहेर येईल, असे डॉक्टरांना वाटले. त्याप्रमाणे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करण्यात अनेक धोकेही होते. लोहचुंबकच गायीच्या पोटात अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तसे झाले असते, तर आणखी मोठी समस्या निर्माण झाली असती. तथापि, विशिष्ट पद्धतीने गायीच्या तोंडातून एक शक्तीशाली पण आकारने मध्यम असा लोहचुंबक तिच्या पोटात सोडण्यात आला. तो पोटात फिरविल्यानंतर त्याला आत अडकलेला खिळा चिकटला. त्यानंतर लोहचुंबक बाहेर काढण्यात आला. अशा प्रकारे या गायीची सुटका करण्यात आली. लोहचुंबकाचा उपयोग करुन अशा शस्त्रक्रिया यापूर्वी अगदी कमी प्रमाणात करण्यात आल्या आहेत. खिळे किंवा लोखंडच्या अन्य वस्तू प्राण्यांच्या पोटात गेल्यास त्यांच्या जठराला आणि आतड्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. पण या गायीचे प्राण वाचविण्यात यश आले.
Comments are closed.