दिल्ली विमानतळावर 34 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका मोठ्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. क्वालालंपूरहून दिल्लीत आलेल्या एका भारतीय प्रवाशाला संशयावरून थांबवण्यात आले. प्रवाशाच्या दोन ट्रॉली बॅग तपासल्यावर, त्यात पांढऱ्या पावडरची चार पाकिटे आढळली. हा पदार्थ हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या हेरॉईनचे वजन अंदाजे 6.9 किलोग्रॅम आहे. या जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत अंदाजे 34.67 कोटी रुपये आहे. सीमाशुल्क विभागाने एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रवाशाला अटक केली आहे. तसेच हेरॉईनही जप्त करण्यात आले आहे.
Comments are closed.