11 चेंडूंत 50 धावा! श्रीलंका ए विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड
भारत ए, श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए यांच्यात तिरंगी मालिका श्रीलंकेत सुरू आहे. या मालिकेचा अंतिम सामना रविवारी (२१ जून) भारत आणि श्रीलंका यांच्यात दांबुला येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आक्रमक सुरूवात केली. त्याने ११ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत लिस्ट ए मालिकेतील सर्वात जलद अर्धशतकाचा विश्वविक्रम मोडला.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वैभवने त्याच्या पहिल्याच चौकार मारत संघाला अप्रतिम सुरूवात करून दिली. दुसऱ्या चेंडूवरही त्याने चौकारच ठोकला. या मालिकेत निराशाजनक सुरूवात झाल्यानंतर तसेच मागील काही दिवसांपूर्वी विरोधी संघाविरुद्ध झालेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर या १५ वर्षीय खेळाडूने केलेली ही सुरूवात चित्र पालटणारी ठरली आहे.
वैभवने या सामन्याच्या तिसऱ्या षटकात ३ षटकार आणि २ चौकार मारत २६ धावा वसूल केल्या. हे षटक मोहम्मद शिराजने टाकले, ज्याने वैभवला या मालिकेतील पहिल्या सामन्यात लवकर बाद करण्याची कामगिरी केली होती. आता वैभवने त्याचा खेळ बदलत केवळ ११ चेंडूत ४, ४, ४, ६, ६, ०, ६, ४, ४, ६, आणि ६ असे फटके मारले आणि ५० धावांचा टप्पा गाठला. हे अर्धशतक लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठरले. याबरोबरच त्याने २० वर्ष जुना विक्रम मोडला.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारे खेळाडू ( चेंडूनुसार)
११ – वैभव सूर्यवंशी (भारत ए विरुद्ध श्रीलंका ए, २०२६), श्रीलंका
12 – के वीरारत्ने रागामा क्रिकेट क्लब विरुद्ध कुरुणेगाला युथ क्रिकेट क्लब, कोलंबो, 2005-06
१३ – एनएलटीसी परेरा (श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ब्लूमफील्ड क्रिकेट अँड ॲथलेटिक क्लब, पनागोडा, २०२०-२१
१४ – आरके क्लेनवेल्ड्ट (वेस्टर्न प्रोव्हिन्स विरुद्ध क्वाझुलू-नताल), दर्बन, २०१०-११
Comments are closed.