10 चौकार, 8 षटकार अन् 29 चेंडूंत 94 धावा! वैभव सूर्यवंशीचे वादळ, फायनलमध्ये श्रीलंकेचा गेम वाजव

वैभव सूर्यवंशी विश्वविक्रम श्रीलंका अ विरुद्ध भारत अ अंतिम त्रिराष्ट्र अ मालिका 2026 : श्रीलंका अ संघाविरुद्धच्या तिंरगा मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली. फायनलच्या या हाय-व्होल्टेज सामन्यात वैभवने श्रीलंकेच्या गोलंदाजांना अक्षरशः धू धू धुतले. त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 94 धावांची वादळी खेळी खेळली. दुर्दैवाने, अवघ्या 6 धावांनी त्याचे शतक हुकले, पण बाद होण्यापूर्वी त्याने टीम इंडियाला चांगल्या स्थितीत पोहोचवले.

11 चेंडूत विक्रमी अर्धशतक (वैभव सूर्यवंशी मिसेस वर्ल्ड रेकॉर्ड)

वैभव सूर्यवंशीच्या या तुफानी खेळीचा अंदाज यावरून लावता येतो की, त्याने मैदानात येताच चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या डावात 10 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार ठोकले. विशेष म्हणजे, त्याने अवघ्या 11 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या खेळीदरम्यान सुरुवातीच्या 64 धावा त्याने फक्त चौकार-षटकारच्या मदतीने वसूल केल्या होत्या. अखेर श्रीलंकेचा कर्णधार सहान अराच्चिगेच्या चेंडूंवर विजयकांतने त्याचा झेल घेतला आणि ही वादळी खेळी संपुष्टात आली.

मैदानावरील वादाचा वचपा काढला (Vaibhav Sooryavanshi India A vs Sri Lanka A Tri-Nation Series Final)

तिंरगा मालिकेतील मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्धच्या सुपर ओव्हरदरम्यान वैभव अपयशी ठरला होता. त्यावेळी श्रीलंकन खेळाडूंनी त्याच्यासोबत मैदानावर हुज्जत घातली होती, अगदी ऑन-कॅमेरा धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण गेले होते. मात्र, वैभवने त्यावेळी संयम राखला आणि आपल्या रागाचा बदला फायनलमध्ये बॅटने घेतला.  अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारताला फलंदाजी दिली होती, आणि 15 षटकांत भारताने 2 बाद 153 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा सध्या खेळत आहेत.

इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यापूर्वी मोठा इशारा

या मालिकेतील दमदार कामगिरीनंतर वैभव आता टीम इंडियाच्या मुख्य संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या दौऱ्यापूर्वीच वैभवने या दोन्ही संघांना आपल्या वादळी फॉर्मचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi : खराब फॉर्ममुळे, मैदानावर राडा अन् आता थेट विश्वविक्रम… वैभव सूर्यवंशीने श्रीलंकेचा हिशोब चुकता केला, अवघ्या 11 चेंडूत बदलून टाकला इतिहास-भूगोल

Comments are closed.