IREvsIND: आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेआधीच भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू झाला बाहेर

भारतीय संघाने नुकतेच घरच्या मैदानावर अफगाणिस्तानला वनडे मालिकेत ३-० असे पराभूत केले. आता भारत आर्यंलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार असून त्यासाठी आधीच संघ जाहीर झाला आहे, मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी (२१ जून) एक निवेदन जाहीर केले, ज्यामध्ये वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे संघाबाहेर झाला असल्याचे सांगितले आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, ‘आयपीएल २०२६ मध्ये डाव्या पायाला झालेल्या दुखापतीनंतर वरुण चक्रवर्ती बीसीसीआय सीओई येथे त्याच्या पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यात आहे. तो आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे.’

तसेच वरुणच्या बदली खेळाडूची अद्याप मंडळाने घोषणा केलेली नाही. ही मालिका श्रेयस अय्यरच्या टी२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपदाची पहिलीच मालिका असणार आहे. यातील पहिला सामना २६ जून रोजी आणि दुसरा सामना २८ जून रोजी खेळला जाणार आहे. वरुण बाहेर पडल्याने मंडळाने सुधारीत संघ जाहीर केला असून तो खालीलप्रमाणे,

आयर्लंड टी20 मालिकेसाठी भारताचा सुधारीत संघ-
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसीध कृष्णा.

Comments are closed.