ओमराजेंचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेणार, केवळ घोषणा बाकी; तानाजी सावंतही आले

धाराशिव : मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच माझा राजकीय निर्णय घेणार असल्याची भूमिका खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी मांडली. त्यानंतर, आज आपल्या धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथील गावात त्यांनी मतदारसंघातील सर्वच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावले होते, या कार्यकर्त्यांशी ओमराजेंनी बंद दाराआड चर्चा केली असून ओमराजेंनी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) जावे, असा सूर काहींननी व्यक्त केला. त्यानंतर, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji sawant) हेही गोवर्धनवाडी येथे पोहोचले असून ओमराजे निंबाळकर शिवसेनेमध्ये येणार आहेत, विकासाच्या दृष्टीने ओमराजे निंबाळकर निर्णय घेणार आहेत, असा गौप्यस्फोटच त्यांनी केलाय.

ओमराजे निंबाळकर यांचे शिवसेना शिंदे गटात जाण्याचे निश्चित झाले असून शिवसेना प्रवेशाची फक्त घोषणा बाकी आहे. ओमराजे निंबाळकरांनी आज लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे जिल्ह्यातील वाढते प्रस्थ, सत्ता नसल्याने निधीसाठी होत असलेली कसरत, त्या पार्श्वभूमीवर ओमराजेंनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत गेल्याशिवाय लोकांची काम करता येणार नाही ही त्यांची भावना आहे. गोवर्धनवाडीत बैठकीनंतर कार्यकर्त्यांची भाषणं सुरू आहेत, त्यामध्ये शिवसेनेत जाण्याचा निर्णय झाल्याचंही दिसून येत आहे.

तानाजी सावंत ओमराजेंच्या भेटीसाठी दाखल

‘ऑपरेशन टायगर’ मध्ये ओमराजे निंबाळकर यांची जबाबदारी तानाजी सावंत यांच्यावर दिल्याची चर्चा होती. तानाजी सावंत यांनी आपल्यावर ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी असल्याचा दुजोरा दिला. तसेच, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी कोर्टाचा निर्णय झाला, त्यामुळे माझे ओमराजे यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याने आपण त्यांची भेट घेण्यासाठी आल्याचे तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

मी तीन दिवसांपूर्वी तुमच्यासाठी चांगला होतो, मग..; ओमराजे धाराशिवमध्ये, एबीपी माझावर भरभरुन बोलले, राजकीय भूमिका काय?

Comments are closed.