Kokan News – दापोली शहरातील प्रभुआळी येथील ग्रामस्थांचा पाऊस पडण्यासाठी खाकोबा मंदिरातील पिंडीवरती जलाभिषेक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली शहरातील प्रभूआळी येथील श्रीराम देवस्थान तर्फे प्रभुआळी येथील ग्रामस्थांनी लांबलेला पाऊस पडाण्यासाठी श्रीराम मंदिरात महाआरती करून भार्गव रामा पाऊस दे चा ढोल सनई टिमकी या पारंपरिक खालू बाजा वाद्यांच्या तालावर देवाच्या नावाने जयघोष केला .

दापोली शहरातील प्रभुआळी ते श्री.देव खाकोबा मंदिर देवस्थान दरम्यान येथील सर्व ग्रामस्थांनी सवादयांच्या तालावर भार्गव रामा पाऊस दे अशा प्रकारच्या गजराच्या नामाचा जयघोष केला.त्यानंतर श्री देव खाकोबा मंदिरातील पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. यावेळी प्रभूआळी येथील लहान थोर अबाल वृध्दांनी जेष्ठ श्रेष्ठ थोर मंडळींनी तसेच महिलांनी हाती कळशी , हंडे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होत देवाला पाऊस पडण्यासाठी विनंती केली.

Comments are closed.