FIFA World Cup 2026 – गुलाबी बुटांची गोलधूम!
फिफा वर्ल्ड कपमध्ये गोलांइतकीच चर्चा गुलाबी फुटबॉल बुटांची रंगली आहे. फ्रान्सचा किलियन एमबाप्पे, इंग्लंडचा हॅरी केन, ब्राझीलचा विनिसियस ज्युनियर आणि अमेरिकेचा जिओ रेना हे स्टार खेळाडू गुलाबी बूट घालून मैदानात उतरले आहेत. हिरव्या गवतावर दूरवरून उठून दिसणारे हे बूट आत्मविश्वास, ऊर्जा आणि वेगळी ओळख यांचे प्रतीक मानले जात आहेत. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत गोलांच्या वर्षावाबरोबरच गुलाबी बुटांचाही ट्रेंड फुटबॉलविश्वात चांगलाच गाजत आहे. या बूटांमुळे वर्ल्ड कपच्या रंगात गुलाबी वातावरणाची एण्ट्री झाली आहे.
Comments are closed.