संवाद कायम ठेवा, आपण चर्चेतून पुढे जाण्याचा मार्ग शोधू शकतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर प्रतिहल्ला :आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु

मुंबई :

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावासाळी अधिवेशन उद्यापासून (आजपासून) सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची पत्रकार परिषद झाली. या अधिवेशनात आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतून सगळ्या गोष्टींची उत्तर द्यायला तयार आहोत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तीन आठवडे हे पावसाळी अधिवेशन

तीन आठवडे हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही करु असे मुख्यमंत्री म्हणाले. या अधिवेशनात 10 विधेयके आम्ही मांडणार आहोत. यामध्ये महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक असणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान पत्रकार  परिषदेमध्ये बोलताना राज्यात सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकाने नुकतीच कर्जमाफी जाहीर केली आहे, यावरून देखील विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच यंदा राज्यावर अल निनोचं सावट आहे. त्यामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर सरकारने आतापर्यंत काय तयारी केली असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी महिलांना दिलासा देणारा निर्णय

या अधिवेशनात 10 विधेयक मांडले जाणार आहेत. महिला शेतकरी या संदर्भात विधेयक आणल्यास महिलांना त्याचा फायदा कसा होईल, याची तपासणी झाली. शेतीत अनेक महिला शेती करतात, पण त्यांना शेतकरी मानले जात नाही. पण आता शेतकरी महिलांना दिलासा देणारा निर्णय या अधिवेशनात आम्ही घेणार आहोत, असेही ते पुढे म्हणाले.

विरोधकांनी दिलेल्या पत्रामध्ये तेच मुद्दे दिसत आहे. 2023 पासून एक मजकूर सारखाच दिसतो. समोर कोणतीही निवडणूक नसताना आम्ही शेतकरी कर्जमाफी केली. अशामध्ये लोकांना अपेक्षित मुद्दे विरोधकांना अवगत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आम्ही शेतकऱ्यांना विचार करतो. कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही. यंदाच्या घडीला आपण एक समिती तयार केली आहे.

56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा?

या समितीच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीचा पूर्ण अभ्यास केला आहे. परिस्थिती पाहून कर्जमाफी करावी लागते,  समितीच्या अहवालानुसार काही निकष लावले आहेत. 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे, असे म्हणत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले. सरकार चुकत असेल तर विचारा; पण बिनबुडाचे आरोप करू नका. लोकांचे प्रश्न विरोधकांना अवगतच नाहीयेत,  आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही, कोणत्याही निवडणुका नसताना कर्जमाफी केली आहे, असे यावेळी फडणवीस म्हणाले.

एल निनोनं पाऊस लांबला

राज्यात सरासरीपेक्षा 80 टक्के कमी पाऊस पडला. राज्यात सरासरीपेक्षा 80 टक्के कमी पाऊस पडला आहे. कोकणात 86 टक्क्यांपर्यंत पाऊस कमी आहे.  मराठवाड्यात 79 टक्के कमी आहे. काही जिह्यात पावसाचा थेंब देखील नाही. कोकणात 23 जून पासून पावसाचा जोर धरेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

Comments are closed.