'लग जा गले'मध्ये जान्हवी

टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर आणि लक्ष्य मोठ्या पडद्यावर एकत्र दिसून येणार आहेत. अॅक्शनपट ‘लग जा गले“ या चित्रपटाकरता तिघेही एकत्र आले आहेत. राज मेहता यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती करण जौहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत करण्यात येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 मे रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. जान्हवी कपूर अन् टायगर श्रॉफ यांची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जान्हवी या चित्रपटाच्या निमित्ताने अॅक्शन सीन्स करताना दिसून येणार आहे.

जान्हवी यापूर्वी ‘पेद्दी“ चित्रपटात राम चरणसोबत दिसून आली आहे. परंतु या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.  तर लक्ष्य हा यापूर्वी ‘चांद मेरा दिल“ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता.

 

Comments are closed.