अभिजित दिपके यांनी उपोषण करण्याची धमकी दिली.

दुसऱ्या दिवशीही जंतर-मंतरवर ‘सीजेपी’चे आंदोलन : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रात्रभर ठाण

वृत्तसंस्था/ कोलकाता

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) जंतर मंतरवरील आंदोलन रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक रात्रभर जंतर मंतरवर ठाण मांडून बसले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांचे समर्थक शनिवार सकाळपासूनच जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. आता शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर 27 जून रोजी उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दिल्ली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यानंतर आंदोलनाची परवानगी संपणार असल्याचे सांगून त्यांना जागा खाली करण्यास सांगितले होते. असे असूनही आंदोलक रात्रभर जंतर-मंतरवर थांबले. दीपके यांनी जनतेला या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी नीट फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेनंतर आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले. यापूर्वी शनिवारी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील आंदोलनात सामील झाले होते.

 

Comments are closed.