‘भाजपने दहा-दहा लाख रुपये देऊन आमचे मतदार फोडले; नैतिक दृष्टिकोनातून माझाच विजय; अतुल लोंढे

नागपूर विधान परिषद निवडणूक निकाल 2026 वर अतुल लोंढे: ‘भाजपने दहा-दहा लाख रुपये देऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले. मात्र मी कोणाचीही तक्रार करणार नाही. शिवाय मी पराभूत झालो नाही, माझाच नैतिक विजय झालाय’ अशी पहिली प्रतिक्रिया नागपूर विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी दिली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत (Nagpur Vidhan Parishad Election Result 2026) भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार राजीव पोतदार (Rajiv Potdar) यांचा तब्बल 682 मतांनी विक्रमी विजय झाला आहे. तर काँग्रेसच्या (Congress) अतुल लोंढेंना (Atul Londhe) मतफुटीचा मोठा फटका बसला असून त्यांचा यात पराभव झाला आहे. काँग्रेसच्या अतुल लोंढेंना 130 मत मिळाले आहे. दरम्यान, काँग्रेसचे स्वतःचे 170 मत असताना आणि महाविकास आघाडीचे एकूण 211 मत असताना काँग्रेसचे उमेदवाराला फक्त 130 मत मिळाली आहे. म्हणजेच महाविकास आघाडीसह काँग्रेस पक्षाचे मतही फुटले असल्याचे चित्र आहे. यावर बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपवर थेट आरोप करत खळबळजनक दावा केला आहे. (BJP Candidate Rajiv Potdar Wins)

दहा दहा लाख रुपये देऊन 100 मतांची क्रॉस वोटिंग, नैतिक दृष्टिकोनातून मी निवडणूक जिंकलोहे

भाजपने दहा दहा लाख रुपये देऊन 100 मतांची क्रॉस वोटिंग करून घेतली, असा गंभीर आरोप नागपूर विधानपरिषद मतदारसंघातून काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी केला आहे. दरम्यान महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या फुटलेल्या मतांसंदर्भात कोणालाही तक्रार करणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले. मुळात मी निवडणूक पराभूत झालेलो नाही, तर नैतिक दृष्टिकोनातून मी निवडणूक जिंकलो आहे. कारण नागपूरात भाजपच्या दादागिरी समोर मी उभं राहून निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही आणि किमान मला मिळालेले 130 काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार विकले गेले नाही, हेच या निवडणुकीतून सिद्ध झालंय, असं देखील अतुल लोंढे म्हणाले.

Rajiv Potdar Wins : भाजपची शक्ती फक्त नागपूर शहरात नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात आहे.

दरम्यान,  चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण टके यांनीजी रणनीती आखली होती ती यशस्वी ठरली आणि एका भूतपूर्व विजय भाजपला नागपुरात मिळाला आहे. भाजपची शक्ती फक्त नागपूर शहरात नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात आहे. हे आजच्या निकालातून दिसून आले आहे. काँग्रेस उमेदवार त्यांच्या पक्षाचे मतही मिळवू शकला नाही. काँग्रेसचे 170 मत असताना अतुल लोंढे यांना फक्त 130 मतं मिळाले. म्हणजेच काँग्रेसच्या 40 नगरसेवकांनीही आपल्या उमेदवाराला मतं दिली नाही. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचेही मतं अतुल लोंढे यांना मिळू शकले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या छोट्या पक्षांसह अनेक काँग्रेस नगरसेवकांनी आम्हाला साथ दिली अशी अभिप्राय भाजपचे विजयी उमेदवार राजीव पोतदार यांनी दिली.

नागपूर विधान परिषद निकाल (नागपूर विधान परिषद निवडणूक निकाल 2026)

भाजप – ६८२

काँग्रेस (Congress) -130

बेकायदेशीर – 11

Comments are closed.