Maharashtra MLC Election Result 2026 – नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गितेंचा विजय, शिंदे गटाचे दराडे पराभूत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवला आहे. गोकुळ गिते यांनी शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला आहे.

बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील 18 जागांपैकी 7 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. पण उर्वरित अकरा जागांवरील मतमोजणी सोमवारी पार पडली. 11 जागापैकी 10 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी तर नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव झाला. गोकुळ गिते यांना 357 मते मिळाली, तर नरेंद्र दराडे यांना 248 मतांवर समाधान मानावे लागले. गिते यांनी दराडे यांचा 109 मतांच्या फरकाने पराभव केला.

नाशिक मतदारसंघातील ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत आली होती. गोकुळ गिते यांनी दराडे यांच्या मुलाने अपशब्द वापरल्याचा आरोप करत अपक्ष म्हणून शर्यतीत कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. हा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे उदय सामंत यांनी गोकुळ गिते यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली होती. या गिते यांनी आपला प्रचार थांबवण्याची घोषणा केली होती. परंतु अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यामुळे त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम होते. आता तेच विजयी झाल्याने महायुतीमध्ये वादाचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.

Comments are closed.