Lucknow Fire Tragedy लखनौमध्ये तीन मजली इमारतीला आग, 15 जणांचा होरपळून मृत्यू…
सोमवारी लखनौच्या अलीगंज भागातील उषा मेहता मार्गावरील तीन मजली इमारतीला आग लागल्याने किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, काही विद्यार्थी इमारतीत अडकल्याच्या वृत्तानंतर बचाव पथके प्रत्येक खोलीत शोध घेत आहेत.
आग नियंत्रणात आणल्यानंतर, शेजारच्या इमारतीमधून स्ट्रेचर्स आत नेण्यात आले. बचाव पथकाने स्ट्रेचर्स आत नेणे सोपे व्हावे यासाठी भिंतीत एक छिद्र पाडले. अधिकाऱ्यांच्या मते, अजूनही चार ते पाच लोक आत अडकले असण्याची शक्यता असून, आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लखनौमधील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे त्यांना दुःख झाले असून, त्यांनी शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आणि सांगितले की, बचावकार्य सुरू असून प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.
पंतप्रधान मोंदींनी जाहीर केली २ लाखांची मदत
पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) २ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली , तर जखमींना ५०,००० रु. मिळतील .
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आणि शोकाकुल कुटुंबियांना सांत्वना पाठवली.
मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ बाधित कुटुंबांपर्यंत पोहोचून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. तसेच, आगीत जखमी झालेल्यांवर सर्वोत्तम उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक काय म्हणाले?
पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले, “बचावकार्य काही मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे… सर्व मुलांची सुरक्षित सुटका करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यापैकी बहुतांश मुलांना आधीच बाहेर काढण्यात आले आहे.”
सध्या सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती देताना पाठक म्हणाले की, इमारतीत प्रवेश मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब केला. “अग्निशमन दलाच्या जवानांनी शेजारच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंत तोडून आत प्रवेश केला. दाट धुरामुळे एक्झॉस्ट फॅन बसवण्यात आले असून, प्रत्येक खोलीची तपासणी सुरू आहे. प्रत्येक खोलीची तपासणी करण्यात आली असून, स्वच्छतागृहेही तपासण्यात आली आहेत,” असे ते म्हणाले.
Comments are closed.