सुप्रिया सुळे अन् अभिनेता रवि किशनचा हटके अंदाज, लेकीच्या लग्नात दोघांनी केला डान्स VIDEO

रेवती सुळे लग्न : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) आणि सदानंद सुळे (Sadanand Sule) यांची लेक रेवती सुळेचं (Revati Sule) 20 जून रोजी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात अनेक  दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली.  राजकीय नेते, उद्योजक ते सेलिब्रिटी.. या लग्न सोहळ्यात नामवंत  कलाकारांनी हजेरी लावली. सध्या सोशल मीडियावर संगीत सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. राजकीय मैदानातून ते थेट स्टेज परफॉर्मेंस, रेवती सुळेच्या संगीत कार्यक्रमात सुप्रिया सुळेंची कधी न पाहिलेली बाजू पाहायला मिळाली.  त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

रेवती सुळेचा विवाह सारंग लखानीसोबत पार पडला. संगीत कार्यक्रमात किंग खान शाहरुखने आपला आयकॉनिक स्टेप केला. तसेच त्यानं  रेवती आणि सारंगलाही डान्स करण्यास भाग पाडले होते. या संगीत सोहळ्याला भाजप खासदार आणि अभिनेता रवि किशनही उपस्थित होते.  त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सुप्रिया सुळेंचा रवि किशनसोबतचा हटके अंदाज पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं.

रेवती सुळेच्या संगीत कार्यक्रमात अनेक बॉलिवूड गाण्यांवर सुळे आणि पवार कुटुंबाने एन्जॉय केला. ‘मेरे सपनो की रानी…’ या गाण्यावर सुप्रिया सुळे आणि रवि किशन एकत्र थिरकताना दिसले. या जुन्या बॉलिवूड गाण्यावर दोघांनी एकत्र डान्स केला. सध्या दोघांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

रेवती सुळेच्या लग्नात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी (Revati Sule Wedding Ceremony)

रेवती आणि अरुण लखानीच्या  लग्नापूर्वीच्या संगीत सोहळ्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. फिल्म सेलिब्रिटींमुळे संगीत सोहळ्यापासून लग्नापर्यंत या खास सोहळ्यांना रंगत आली. संगीत समारंभात शाहरुख खानने हजेरी लावून  कार्यक्रमाला चारचांद लावले.  तर, लग्नसमारंभात  खासदार आणि अभिनेता रवि किशन, अमिताभ बच्चन, जया बच्चन, रणबीर कपूर, रितेश देशमुख,  जिनिलिया देशमुख, सिंगर राहुल वैद्य उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘विठाबाईं’च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; ‘ईठा’चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

Comments are closed.