नाशिकचे अपक्ष विजयी उमेदवार गोकुळ गिते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार : श्रीकांत शिंदे
श्रीकांत शिंदे: नाशिकमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय झाला आहे. यामुळं महायुतीला धक्का बसला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. गोकुळ गीते विजयी झाल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आजच पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता होती. स्वत: शिवसेनेचे मंत्री व संपर्क नेते उदय सामंत हे गोकुळ गिते यांना घ्यायला नाशिकमध्ये आले होते. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या विशेष विमानाने उदय सामंत हे गोकुळ गिते यांना घेऊन मुंबईला आले यानंतर गीते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषदही घेतली. गीते हे शिंदे साहेबांच्या कामावर प्रभावित आहेत. म्हणून ते सहयोगी सदस्य म्हणून काम करतील अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
गोकुळ गीते हे शिंदे साहेबांच्या कामावर प्रभावित
निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला आहे. निवडणुकीत यश अपयश येत असते. गोकुळ गीते हे शिंदे साहेबांच्या कामावर प्रभावित होऊन ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करतील असे श्रीकांत शिंदे म्हणाले. शिवसेना वाढीसाठी त्यांना शिंदेसाहेब जी जबाबदारी देतील ती ते पूर्ण करतील असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
सहा खासदार शिंदे साहेबांचे काम पाहून आल्याचे ते म्हणाले. माणूस पराभव झाला की काही वेगळी कारणे देत असतो, एकनाथ शिंदे हे दराडे यांच्यासोबत संवाद साधतील असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. आम्ही धमाके करत आहोत, शिंदे साहेब बोलले आहेत की, यह तो ट्रेलर है असे सूचक वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं.
नाशिक विधानपरिषदेत अपक्ष निवडणून आलेले गोकुळ गीते यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गोकुळ गीते हे सहयोगी गट म्हणून शिंदेंच्या शिवसेनेसोबत असणार आहेत याची ग्वाही त्यांनी दिली. ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्याविरोधात जनता माझी बाप होऊन मतदान मला केल आहे, असेही ते म्हणाले. आज विधानपरिषदेच्या निवडणुकीत माझा विजय झाला आहे. मी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मला सहयोगी म्हणून काम करत आहे अशी मी इच्छा व्यक्त केली. मी 10 मिनिटे भेट घेतल्याचे गोकुळ गिते म्हणाले. दराडे यांचा पराभव झाला आहे म्हणून ते उधिग्न बोलत आहेत. ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्या विरोधात माझे बाप म्हणून उभे राहिले. मला भाजपकडून कोणीही संपर्क केलेला नाही असे गिते म्हणाले.
शिवसेनेचा विश्वासघात झाला – दराडे
भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धुव्वा उडवला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवून गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या धक्कादायक पराभवामुळे महायुतीला मोठा झटका बसला आहे. दरम्यान, या निकालानंतर शिवसेनेचा विश्वास घात झाल्याची प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.
एकनाथ शिंदे भाष्य करतील
नरेंद्र दराडे यांच्या पराभव करत गोकुळ गीते यांनी विजय खेचून आणला. याबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री दादा भुसे यांनी अवघ्या दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. “आम्ही सगळ्याची शहानिशा करू. आमचे नेते एकनाथ शिंदे यावर भाष्य करतील,” असे म्हणत दादा भुसे यांनी या निकालावर बोलणे टाळल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या:
नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; गोकुळ गितेंना एकनाथ शिंदेंचा फोन, आमदार मुंबईकडे रवाना
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Comments are closed.