Ratnagiri News – मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी १ लाखांहून अधिक मतदारांना द्यावा लागणार पुरावा
मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ९२.१० टक्के मतदारांची नावे विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण मतदार यादीसोबत जुळली आहेत. ज्या मतदारांची नावे जुळली नाहीत त्यांना ४ ऑगस्ट नंतर निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात येईल त्यानंतर त्यांनी पुरावे सादर करून मतदारयादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यायचे आहे, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज (22 जून 2026) पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात एसआयआर कार्यक्रमाचा पहिला टप्पा राबविण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील १३ लाख २९ हजार ४२ मतदारांपैकी १२ लाख २३ हजार ९८६ मतदारांची नावे २००२ सालच्या एसआयआरसोबत जोडली गेली आहेत. १ लाख ५ हजार ५६ मतदारांची नावे एसआयआर यादीशी जुळली नाहीत. जी नावे जुळली आहेत त्या सर्व मतदारांकडून बीएलओ ३० जून ते २९ जुलै दरम्यान अर्ज भरून घेणार आहेत. जी नावे एसआयआरशी जुळली नाहीत अशा मतदारांना ४ ऑगस्ट नंतर निवडणूक आयोग नोटीस पाठवणार आहे. ही नोटीस बीएलओ मतदारांपर्यंत पोहचवणार आहे. मतदारयादीत नावे नसलेल्या व्यक्तींची सुनावणी होणार आहे. मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी काही पुरावे सादर करावे लागणार असल्याची निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी यावेळी सांगितले. यासर्व प्रक्रियेनंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. अंतिम मतदारयादीतून मृत व्यक्तींची नावे वगळली जाणार आहेत. यावेळी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी उपस्थित होते.
नोटीस प्राप्त झाल्यानंतर मतदारांनी स्वतःची जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी (तसेच आवश्यकतेनुसार माता-पित्यांचे) खालीलपैकी कोणतेही एक स्व-प्रमाणित कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे:
महत्त्वाची अट: १ जुलै १९८७ पूर्वी, १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान आणि २ डिसेंबर २००४ नंतर हिंदुस्थानात जन्म झालेल्या नागरिकांसाठी, तसेच हिंदुस्थानाबाहेर जन्म झालेल्या किंवा नागरिकीकरण प्राप्त केलेल्या व्यक्तींसाठी नियमांनुसार स्वतःचे किंवा पालकांचे वैध पुरावे सादर करावे लागतील.
Comments are closed.