शरद पवारांचा मोहरा भाजपच्या गळाला? बुलढाणा जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण, राजेंद्र शिंगणे 3 दि

राजेंद्र शिंगणे : बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. बुलढाणा जिल्हाभरात डॉ. राजेंद्र शिंगणेंबाबत चर्चेला उधाण आलं आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे हे गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रतीक्षेत असल्याची माहिती देखील मिळत आहे. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामासंदर्भात राजेंद्र शिंगणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.

माझं जसं सुरू आहे, तसंच सुरु आहे, शिंगणेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे गेल्या तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होते . बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामाच्या निमित्ताने ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत असल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता असल्याच्या चर्चेने जिल्हाभरात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र “एबीपी माझा” ने डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याशी संपर्क करून त्यांची भूमिका जाणून घेतली. ते म्हणाले की, “मी मंत्री आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित असून जिल्हा सहकारी बँकेच्या निमित्ताने त्यांना काही पत्र मला द्यायचे आहेत. भाजपमध्ये प्रवेशाच्या प्रश्नावर त्यांनी बगल देत म्हटलं की, “माझं जसं सुरू आहे, तसंच सुरु आहे.” यामुळं मात्र बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वर्तुळात डॉ. राजेंद्र शिंदे हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

कोण आहेत राजेंद्र शिंगणे?

राजेंद्र शिंगणे यांचे वडील भास्करराव शिंगणे यांनी बुलडाण्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. त्यांनी सहाकाराचं जाळं जिल्हाभर विणलं. राजेंद्र शिंगणे यांनीही हे जाळं विस्तारत नेत आपला लोकसंपर्क अधिक वाढवला. त्या बळावर ते सातत्याने निवडून येत आहेत. त्यांच्याकडे विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्षपद होते. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकाराचा चांगला अभ्यास केलेला आहे. संकटात धावून जाणारा नेता, शेतकऱ्यांचा पाठिराखा म्हणूनही त्यांची सिंदखेड राजामध्ये ओळख आहे.

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा या मतदारसंघाचे शिंगणे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. शिंगणे हे 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.  2014मध्ये ते विधानसभा निवडणुकीपासून दूर होते. ते सिंदखेड राजामधून पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, दोन्ही वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांना राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री म्हणून दहा वर्षांचा अनुभव आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला होता.

महत्त्वाची खाती सांभाळली

राजेंद्र शिंगणे यांनी आरोग्य खाते, महसूल खात्याचे राज्यमंत्रीपदही सांभाळलेले आहे. तसेच क्रीडा आणि माहिती जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 2004मध्ये त्यांच्याकडे आरोग्य खाते देण्यात आले होते. आता त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद आहे. त्यांनी 2001, 2004, 2008 आणि 2019 मध्येही त्यांनी पाच वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Comments are closed.