VIDEO: “सुबह का भुला…”, ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतल्यानंतर अक्षर पटेलची रिऍक्शन
मागील महिन्यातच आयपीएल २०२६ हंगाम संपला आणि त्याला काही दिवस होत नाही तोवर पुढील हंगामासाठी एक मोठी ट्रेड डील झाली. २०२६ च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या ट्रेड डीलने सर्वांना चकित केले होते. त्यामध्ये संजू सॅमसन याच्या बदली राजस्थानने चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि सॅम करनला घेतले होते. आता आणखी एक मोठी ट्रेड डील झाली, ज्यावर मंगळवारी (२३ जून) आयपीएलने अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला. त्याला लखनऊ सुपर जायंट्सकडून कुलदीप यादवच्या बदल्यात ट्रेड केले आहे. यानंतर अक्षर पटेल आणि पंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये कर्णधार अक्षर पटेलने मजेशीररित्या पंतचे स्वागत केले. झालेल्या करारानुसार, पंत लखनऊमधून त्याच्या आधीच्या फ्रॅंचायझीमध्ये आला आहे. तो दिल्ली संघात १५ कोटी रुपयांना परतला आहे, तर कुलदीप १३.५ कोटी रुपयांमध्ये लखनऊमध्ये सामील झाला आहे. या चर्चात्मक ट्रेडनंतर दिल्लीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये पटेल करार निश्चित झाल्यानंतर पंतसोबत झालेल्या त्याच्या पहिल्या संभाषणाबद्दल सांगितले आहे. अक्षरच्या म्हणण्यानुसार, पंतने ही बातमी देण्यासाठी त्याला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा पटेल आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत होता. त्यामुळे त्याला पंतचे कॉल घेता आले नाही, मात्र जेव्हा अक्षरने पंतला फोन केला, तेव्हा उत्साही पंतने लगेचच सांगितले की, “कन्फर्म हो गया भाई, मैं वापस आ रहा हूं.”
यावर अक्षरने एका हिंदी म्हणीचा वापर करत पंतचे स्वागत केले. तो म्हणाला, “सुबह का भूला अगर शाम को घर वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते.”
लखनऊने २०२५ च्या लिलावात पंतला विक्रमी २७ कोटी रुपयांना विकत घेतलो होते, मात्र लखनऊसोबत त्याचा प्रवास अत्यंत निराशाजनक राहिला. त्याने दोन वर्षांत ५८१ धावा केल्या आणि लखनऊचे नेतृत्व करताना संघाने १० सामने जिंकले, तर १८ सामने गमावले. त्याआधी तो २०१६ ते २०२४ दरम्यान दिल्लीचा भाग होता. या नऊ हंगांमामध्ये त्याने ३२८४ धावा केल्या होत्या.
Comments are closed.