दरवाजा बंद करण्यावरून झाला वाद, लोकलमध्ये माथेफिरूने धारदार सुऱ्याने तरुणाला भोसकले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत चर्चगेट विरार लोकलमध्ये अंधेरी बोरिवली स्थानकादरम्यान माथेफिरूने दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादावरून एका तरुणाला धारदार सुऱ्याने भोसकले. या चाकू हल्ल्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव आहे. लोकल पुढील स्थानकात थांबताच माथेफिरू उतरून निघून गेला. या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सहा पथकं तयार केली असून ते आरोपीचा शोध घेत आहेत.

Comments are closed.