लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सां
केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरण: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी केतन अग्रवाल यांच्या हत्येची कबुली दिली आहे. सदर प्रकरणानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)
अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालं. सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान पोलिसांच्या चौकशीत लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?, याची माहिती समोर आली आहे.
…म्हणून होणारा पती केतनला संपवण्याचा निर्णय घेतला- (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)
सिया आणि केतनचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे साखरपुडा मोडून चेतनसोबत पळून गेल्यास माझ्या कुटुंबाची बदनामी होईल, असा विचार करून नराधम सियाने थेट होणारा पती केतनला संपवण्याचा निर्णय घेतला. तिने चेतन चौधरी या प्रियकरासोबत मिळून केतन अग्रवालची हत्या केली.
नेमकं प्रकरण काय? (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)
बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
केतन अगरवालच्या हत्येनंतरचा घटनाक्रम- (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)
– 18 जून केतन अगरवाल पाय घसरुन दरीत पडल्याचा बनाव
– दरीतून मृतदेह बाहे काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडे ‘अशी’ घटना घडेल का? पोलिसांची विचारणा आणि पहिला संशय
– सर्व विधी पार पडल्यावर 21 जूनला कुटुंबीय लोहगडावर पोहचले. केतनचा पडून मृत्यू झाला नसल्याचा पोलिसांकडे दावा
– मग सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेंव्हा केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
– लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेंव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का? असे एकणानेक प्रश्न विचारताचं ती अनुत्तरित झाली
– बहीण संजनाच्या प्रश्नांनी सियावर संशय वाढला.
– वडील आणि बहिणींनी उपस्थिती केलेली शंका, दिलेले जबाब यातून तपासाची चक्र वेगाने हलली.
– जबाबात चेतन चौधरीचं नाव आलं. सिया आणि चेतनचे सिडीआर तपासण्यात आले.
– सिया आणि चेतनमध्ये गेल्या वर्षभरात 2004 वेळा फोन कॉल झाल्याचं आणि तीनशेहुन अधिक तास संवाद झाल्याचं उघड
– पण 18 जूनला तेजसचं लोकेशन लोहगडावर आढळलं नाही.
– एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला.
– तोचं तरुण पुढं जाऊन सियाला काहीतरी खुनवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.
– हा तरुण चेतन असेल तर मग फोन लोकेशन मार्केटयार्ड का दाखवतोय? मग पोलिसांची 18 जूनला चेतनच्या फोनवर आलेल्या व्यक्तींकडे विचारणा.
– चेतनचा फोन दुकानातील कामगारने उचलल्याचे आणि कामगाराचा फोन घेऊन चेतन लोहगडावर आल्याचं स्पष्ट
– 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतलं.
– तेजसला पोलिसी खाक्या दाखवताच सियाचं ही बिंग फुटलं.
संबंधित बातमी:
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.