चेतन मास्क, हुडी, हेडफोन्स घालून आला, तिकीट न घेताच घुसला; लोहगडावरील सुरक्षारक्षकाने अडवताच म्

केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरण: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी केतन अग्रवाल यांच्या हत्येची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, हत्येमागील नेमका कट आणि त्याचे नियोजन उघड करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)

केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवालच्या हत्येचा कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. हत्येच्या दिवशी दोघांनी एका कॅफेमध्ये भेट घेत अंतिम रणनीती ठरवल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. सिया आणि चेतन यांच्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल 2 हजार 4 फोन कॉल्स झाल्याचे उघड झाले आहे. या वारंवार संपर्कामुळे दोघांमधील जवळीक आणि कटातील सहभागाबाबतचा संशय अधिक गडद झाला आहे. (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)

तोंडावर मास्क, डोक्यावर हेडफोन्स घालून चेतनची लोहगडावर एन्ट्री- (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)

केतन अग्रवालच्या हत्येचा कट सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने रचला. घटनेला पूर्णत्वास आणण्यापूर्वी चेतन आणि सिया एका कॅफेमध्ये भेटले आणि केतन अग्रवाल याला कसं मारायचं याचा प्लॅन बनवला. लोहगडावर कुठला पॉईंटवरुन केतनला ढकलले जाऊ शकते याचा प्लॅन दोघांनी आखला. तसेच आरोपी चेतन जेव्हा लोहगडावर आला, तेव्हा त्याने भर उन्हात अंगावर हुडी घातली होती. तसेच तोंडावर मास्क, डोक्यावर हेडफोन्स घालून चेतनने लोहगडावर एन्ट्री केली. त्यानंतर तिकीट न काढताच चेतन गडाच्या दिशेने निघाला. यावेळी लोहगडावरील सुरक्षारक्षकाने चेतनला आवाज देऊन तिकीटासाठी अडवले. यावेळी सर, मी इकडून निघताना तिकीट काढतो…जाताना तुम्हाला पैसे देतो, असं म्हणाला. परंतु गडावरुन जाताना चेतन तिकीटाचे पैसे न देताच निसटला. (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)

आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी; केतनचे वडील काय काय म्हणाले?

केतनच्या मृत्यूबाबत वडील विशाल अग्रवाल म्हणाले की, त्यांचा (सिया गोयल आणि केतन अग्रवाल) फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता… ते 6 तारखेला बालीला जाणार होते; चौघे जण एकत्र प्रवास करणार होते, पण केवळ केतनचाच पासपोर्ट चोरीला गेला. त्यामुळे त्याला जाता आले नाही आणि विमानतळावरून परत यावे लागले. चेतन चौधरी दुचाकीवरून लोहगड किल्ल्यावर पोहोचला. ते दोघे (चेतन चौधरी आणि सिया गोयल) एकत्र वर गेले, त्यांनी केतन विशाल अग्रवालला एका वस्तूने मारले आणि वरून खाली फेकून दिले… पोलिसांनी खूप मदत केली आणि हे प्रकरण अत्यंत वेगाने सोडवले. स्थानिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी मोलाचे सहकार्य केले; त्यांनी त्वरित आम्हाला तपशील कळवला आणि त्या दोघांनाही अटक केली. जर तिला लग्न करायचे नव्हते, तर तिने सरळ नकार दिला असता; आम्ही त्वरित लग्न रद्द केले असते. त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याचे का ठरवले? त्यांची मानसिकता कशी आहे? त्यांची मानसिकता इतकी क्रूर आहे की एखाद्याचा 26 वर्षांचा मुलगा मारला जाऊ शकतो…समाजाने अशा क्रूर मानसिकतेची दखल घेणे गरजेचे आहे. ही विचारसरणी कुठून येते?, असा संतप्त सवाल विशाल अग्रवाल यांनी उपस्थित केला. सरकारला माझी एकच विनंती आहे की, या प्रकरणाची सुनावणी कोणत्याही परिस्थितीत जलद गतीने व्हावी…आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी…सर्वांपर्यंत एक स्पष्ट संदेश पोहोचवण्यासाठी त्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा मिळायला हवी, अशी मागणीही विशाल अग्रवाल यांनी केली.

संबंधित बातमी:

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती

Comments are closed.