Sanjay Raut : हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’! संजय राऊत यांचा सणसणीत टोला, राहुल नार्वेकरांवर निशाणा

Sanjay Raut : हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’! संजय राऊत यांचा सणसणीत टोला, राहुल नार्वेकरांवर निशाणा

पावसावर –

यावर अधिक सविस्तर अभ्यासपूर्वक आदित्य ठाकरे बोलतील
मी स्वतः सकाळपासून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आपले आतले रस्ते आणि नाले जाम आहेत
भारतीय जनता पक्षाचे प्रशासन आणि सरकार मुंबई महानगरपालिकेत आहे ही जबाबदारी त्यांची आहे नालेसफाई अजिबात झालेली नाही
मुंबईतील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत पत्रे लावून ठेवले आहेत मेट्रोची कामे अर्धवट पडलेली आहेत त्याची जबाबदारी कोणी घ्यायची कारण पालकमंत्री जे मुंबईचे आहे ते स्वतः बिल्डर आहेत अर्धी मुंबई त्यांच्यात प्रोजेक्टमुळे खालून ठेवलेली आहे
पावसाळ्यात नवीन कामे काढली आहेत प्रवास कसा करावा तुमच्याकडे पोलिसांचे ताफे आहेत वाहतूक क्लियर केली जाते पण सामान्य माणूस जो आहे त्याची अवस्था काय आहे
मुंबई महानगरपालिका आमच्या काळात आम्ही उत्तमरीत्या सांभाळली 25 वर्ष
अधिवेशन सुरू आहे मिटींग आहे मला काही आमदारांचा फोन आला की पोहोचणे कठीण आहे अशी एकंदरीत अवस्था आहे
जे खासदार फुटले त्यांना गावाला जाण्यासाठी चार्ट फ्लाईट दिले एकनाथ शिंदे यांनी त्यांना गावाला जाण्या येण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट पास काढून दिला आहे
आपला रेल्वेचा बसचा पास असतो तसाच गद्दारांना चार्टर्ड फ्लाईट चा पास काढून दिला आहे

On राहुल नार्वेकर मराठी

हा अत्यंत गंभीर विषय आहे महाराष्ट्रासाठी
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्ष पदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही मराठी लिहिता येत नाही मराठी वाचता येत नाही मराठीत विचार करता येत नाही
हे नार्वेकर आहेत की युरोपमधील एक देश आहे नॉर्वे कर आहेत याचा शोध घ्यावा लागेल
या महाराष्ट्रात मराठी अनिवार्य आहे रिक्षावाला देखील मराठी आली पाहिजे असा आपण कायदा करतो
महाराष्ट्रात मराठीची सक्ती राज्याचे मुख्यमंत्री सांगतात पण त्यांनी नेमलेल्या विधानसभा अध्यक्ष ला मराठी येत नाही मराठीचे दिंडवडे काढतात
आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना मराठीत मांडता येत नाही बोलता येत नाही राज ठाकरे बोलले की ते भेळचा कागद वाचत होते का? हे बरोबर आहे
या माणसाला मराठी बोलता येत नाही मराठी वाचता येत नाही अशा माणसाला त्याच्या पदापासून ताबडतोब दूर केले पाहिजे
मला असे वाटत आहे त्यांना मराठी वाचता येत नाही म्हणून त्यांनी ती लिपी इंग्रजीमध्ये लिहून आणली होती
मुख्यमंत्री छातीवर हात ठेवून सांगतात महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच
रिक्षावाल्यांना मराठी येत नाही म्हणून आपण मारतो आता ह्यांना मारायचं का
मराठी तरुणांना नोकऱ्या द्या म्हणून सांगतो पण यांना मराठी शिवाय विधानसभेची नोकरी यांना कोणी दिली ताबडतोब त्यांच्यावर ती कारवाई करत पदावरून दूर केले पाहिजे
मराठीचा अपमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान
मराठी भाषेला कागदावरती अभिजीत भाषेचा दर्जा दिला अजून त्याचा खाली उतरल्याचं काही दिसत नाही ना
मंगल प्रभात लोढा यांना करा विधानसभा अध्यक्ष
मी जर तिकडे असतो तर जामनराव धोटेंच स्मरण करून अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मी तिथेच एकतर जोडा काढला असता किंवा पेपर वेट फेकून मारला असता मराठी भाषेचा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री यांनी ताबडतोब माफी मागितली पाहिजे

On शिंदे एक झटका

कसले झटके कसले हलाल सत्तेवरून खाली उतरा
आधी आमचा पक्ष आणि चिन्ह न्यायालयातून आम्हाला परत द्यायला सांगा न्यायव्यवस्था विकत घेऊन तुमची दादागिरी सुरू आहे का
पोलिसांचा माफिया सारखा वापर करून ED,CBI चा माफियाचा वापर करून त्याचा तुम्ही उपयोग करत आहात ज्या दिवशी तुमच्याकडेही नसेल त्या दिवशी तुम्ही ही भाषा आम्हाला करून दाखवा
सत्तेच्या जोरावर आणि पोलिसांच्या बळावर एखादा नपुसक देखील सुद्धा एखादा मर्द झाल्याचा आव आणून दाखवतो
मला माहित आहे कोण किती पाण्यात आहेत कोण किती भयमुक्त आहेत हे डरपोक होते म्हणून हे सगळे पळून गेले

Comments are closed.