Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?

Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?

पुण्यातील सिया गोयलनं तिचा होणारा पती केतन अग्रवालची कशी निर्घृण हत्या केली, हे आतापर्यंत तुम्हाला कळालं असेलच..न्यूज चॅनल असो किंवा वर्तमानपत्र… फेसबुक असो किंवा ट्वीटर… सगळ्याच प्लॅटफॉर्मवर हे प्रकरण गाजतंय…  मात्र पोलिसांनी या हत्येचा छडा कसा लावला याची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे…२५ वर्षांचा केतन हा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा… तर २० वर्षांची सिया ही पुण्यात ड्रायफ्रूटचे व्यावसायिक गोयल यांची लेक. फेब्रुवारीमध्ये दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. दोन्ही घरात तयारी सुरू होती लग्नाची.. मात्र सियाचं चेतन चौधरी नावाच्या तरूणावर प्रेम होतं. चेतनशी प्रेम असताना सियानं केतनशी लग्नाला होकार का दिला, त्याचाशी साखरपुडा का केला असा प्रश्न सगळ्यांनाच सतावतोय..  केतनच्या हत्येसाठी सियानं रचलेला पहिला कट कसा फसला? केतनच्या बहिणीला सियावरचा संशय कसा बळावला? हुडी आणि सीसीटीव्हीनं पुणे पोलिसांना कशाप्रकारे मदत केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहुयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट

Comments are closed.