Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर अनेक तर्क वितर्क, आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे. किंबहुना एकवेळा नव्हे तर दोनवेळा ठाकरेंची शिवसेना फोडण्याची कामगिरी करुन ठाकरेंचा सेनाला जबर धक्का दिला आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची मदत मिळाल्याची माहिती आता समोर आली आहे. किंबहुना देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ‘ऑपरेशन टायगर’ खऱ्या अर्थाने मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेबाबत आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविषयी त्यांना विचारले असते मुख्यमंत्र्यानी एका शब्दात प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला आहे.नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाचा आज हस्तांतरण सोहळा पार पडत आहे. मिहान इंडिया लिमिटेड (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची संयुक्त कंपनी) कडून विमानतळाचे हस्तांतरण जी एम आर समूहाला केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांच्या उपस्थितीत विमानतळाचा हस्तांतरण सोहळा जीएमआर समूहाला होणार आहे. या सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट हात जोडत, ‘नो कंमेंट्स’ म्हणत प्रतिक्रिया दिलीय.
Comments are closed.