‘वर्दीत असले तरी मी देखील एक आई’; नसरापूर प्रकरणाचा 16 दिवसांत तपास पूर्ण करणाऱ्या महिला पोलीस
नसरापूर खटल्याच्या निकालाचे अपडेट: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या लहान बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) याला आज (गुरुवारी, दि. 25 जून) पुणे सत्र न्यायालयाने दोषी (Convicted) ठरवले आहे. या संपूर्ण प्रकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि अवघ्या 16 दिवसांत या गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण करणाऱ्या तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक (Police Inspector) विजयमाला पवार यांनी कोर्टाच्या निकालानंतर आपली अत्यंत भावुक आणि तितकीच कडक प्रतिक्रिया दिली आहे.
Nasrapur Case Verdict Updates: जरी मी वर्दीत असले तरी मी देखील एक आई
न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस निरीक्षक विजयमाला पवार म्हणाल्या, “मी जरी वर्दीत असले तरी मी देखील एक आई आहे. मी आज जे काही बोलतेय ते एक आई म्हणून बोलतेय. त्या तीन वर्षांच्या लहान बाळाला काहीही कळत नव्हतं. त्या मुलीला फुस लावून नेले आणि तिच्यावरअत्याचार केला. त्यामुळे आज कुठेतरी त्या चिमुरडीला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे,” असे त्यांनी म्हटले.
Nasrapur Case Verdict Updates: पोलीस खातं आणि गृह खातं सक्षम
आरोपीच्या देहबोलीवर भाष्य करताना पीआय विजयमाला पवार म्हणाल्या की, या प्रकरणाचा तपास महात्वाचा होता. गुन्हा सिद्ध करणं हे आमच्यासमोर आव्हान होतं. या भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. ती एक विकृती आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच, समाजात संदेश जाणं खरजेच आहे की पोलीस खातं आणि गृह खातं सक्षम आहे, असे देखील त्या म्हणाल्या.
Nasrapur Case Verdict Updates: न्यायाधीश आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी भीमराव कांबळे हा 65 वर्षांचा वृद्ध असल्याचा आणि तो स्वतः धक्क्यात असल्याचा युक्तिवाद करत त्याला फाशीऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने आरोपीची ‘पोटन्सी टेस्ट’ आणि ‘मेंटल हेल्थ टेस्ट’ पॉझिटिव्ह आल्याचे सांगत तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचे स्पष्ट केले. स्वतःच्या 7 मुली आणि पत्नीनेही या नराधमाचे अस्तित्व नाकारले असून, न्यायालयाने हा व्यक्ती समाजासाठी अत्यंत घातक असल्याचे नमूद केले आहे.
Nasrapur Case Verdict Updates: आरोपी भीमराव कांबळे काय म्हणाला?
जेव्हा न्यायाधीशांनी त्याला 1 मे रोजी घडलेली घटना आठवून “तुला पश्चात्ताप होतो का?” असे विचारले, तेव्हा आरोपी कोर्टात पूर्णपणे गप्प (निरुत्तर) राहिला. पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी खोटा बनाव रचत म्हटले की, “मी हे कृत्य केलंच नाही. मी त्या मुलीला काठीशेव खायला देण्यासाठी घेऊन जात होतो आणि अचानक माझा पाय घसरल्यामुळे मी पडलो, त्यातच मुलीच्या डोक्याला मार लागला”, असे त्याने म्हटले. दरम्यान, नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याला 29 जून रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. आता न्यायालय आरोपीला काय शिक्षा सुनावणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.