तो प्रसंग आठव आणि सांग तुला काय शिक्षा झाली पाहिजे? कोर्टाचा प्रश्न पण पुन्हा भीमराव कांबळेनं त
नसरापूर खटल्याच्या निकालाचे अपडेट: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्रदिनाच्या दिवशी साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या खटल्याचा निकाल आज 25 जून रोजी लागत आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (65) याला या प्रकरणी दोषी ठरवले आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या पावणेदोन महिन्यांत या खटल्याचा निकाल लागल्याने, राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला हा पहिला खटला ठरणार आहे.
न्यायालयाने भीमराव कांबळे Bhimrao Kamble याच्यावर चाललेल्या सर्व कलमांखालील गुन्हे सिद्ध केले आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, तर एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेप आणि एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आणि अत्यंत गंभीर स्वरात विचारले. “तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे?” असा सवाल उपस्थित केला.
नराधम भीमराव कांबळेचा कोर्टात पुन्हा बनाव
यावर पश्चात्ताप व्यक्त करण्याऐवजी नराधम भीमराव कांबळेने पुन्हा एकदा जुनाच बनाव रचत न्यायालयाला सांगितले की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती.” त्याचे हे उत्तर ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला फटकारत म्हटले की, “आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी?” न्यायाधीशांच्या या रोखठोक विधानावर भीमराव कांबळेकडे कोणतेच उत्तर नव्हते आणि तो पूर्णपणे निरुत्तर झाला. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले.
बालिकेच्या अंगावर तब्बल 18 गंभीर जखमा
सध्या न्यायालयात दोन्ही बाजूंकडून शिक्षेच्या स्वरूपावर अंतिम युक्तिवाद सुरू आहे. सरकारी वकिलांनी आरोपी भीमराव कांबळे याला तात्काळ मृत्युदंड देण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे की, ज्या लहान मुलीने या 65 वर्षांच्या वृद्धावर विश्वास ठेवला, तिच्यावर या नराधमाने तब्बल 39 मिनिटे अत्यंत घृणास्पद प्रकार केला. या लैंगिक अत्याचारादरम्यान त्या निष्पाप बालिकेच्या अंगावर तब्बल 18 गंभीर जखमा (Injuries) झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.
…तर सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास ढळेल
सरकारी वकिलांनी न्यायालयात अशाच इतर गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांचे आणि त्यामध्ये सुनावण्यात आलेल्या सर्वोच्च शिक्षांचे संदर्भ दिले. “आरोपीने केवळ स्वतःच्या वासनेपोटी हे कृत्य केले असून, त्याला कशाचाही पश्चात्ताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. अशा नराधमांमुळे समाजात मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण निर्माण होते. जर आरोपीला योग्य शिक्षा झाली नाही, तर सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास ढळेल,” असा कडक युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. या ऐतिहासिक सुनावणीच्या वेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील हे स्वतः न्यायालयात उपस्थित होते. संपूर्ण राज्याचे लक्ष आता या नराधमाला मिळणाऱ्या अंतिम शिक्षेकडे लागले आहे.
आणखी वाचा
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.