गाडी सजवली, 500 गुलाबांचे गुच्छ अन् फटाक्यांची आतिषबाजी; जंगी ‘प्री-बर्थडे सेलिब्रेशन’नंतर सिया

पुणे: लोहगड मर्डर मिस्ट्रीमध्ये दररोज समोर येणारे खुलासे मन सुन्न करणारे आहेत. आरोपी नवरी सिया गोयल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतन अग्रवालचा (Ketan Agarwal death Case) काटा काढला. मात्र, आता या प्रकरणात एक अत्यंत भावूक आणि तितकाच धक्कादायक पैलू समोर आला आहे. ज्या केतनने अवघ्या महिन्याभरापूर्वी सियाच्या वाढदिवसासाठी (Ketan Agarwal death Case) लाखो रुपयांची उधळण करत जंगी सेलिब्रेशन केले होते, त्याच केतनचा सियाने अत्यंत क्रूरपणे अंत केला. केतनच्या निखळ प्रेमाचा हा असा दुर्दैवी अंत होईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.(Ketan Agarwal death Case)

Ketan Agarwal Murder Case :  गाडीच्या टपावर बर्थडे केक अन् फटाक्यांची आतिषबाजी!

मिळालेल्या माहितीनुसार, २० जून रोजी सिया गोयलचा वाढदिवस होता. हा वाढदिवस खास करण्यासाठी केतनने महिनाभरापूर्वीच मे महिन्याच्या अखेरीस एक जंगी ‘प्री-बर्थडे सेलिब्रेशन’ (Pre-Birthday Celebration) आयोजित केले होते. यासाठी केतनने पाण्यासारखा पैसा खर्च करत जंगी सेलिब्रेशन केलं होतं. संपूर्ण गाडी फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आली होती, ५०० पेक्षा अधिक गुलाबांच्या फुलांचा भव्य गुच्छ सियाला देण्यात आला होता आणि फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली होती. यावेळी सियाने गाडीच्या टपावर (रूफ) बसून अत्यंत आनंदाने आपला प्री-बर्थडे साजरा केला होता. केतन तिच्यावर किती जिवापाड प्रेम करत होता, हेच यावरून दिसत होते.(Ketan Agarwal death Case)

Ketan Agarwal Murder Case :  २० जूनसाठी महाबळेश्वरमध्ये केलं होतं हॉटेल बुक!

केतन एवढ्यावरच थांबला नव्हता. २० जून रोजी येणाऱ्या सियाच्या मुख्य वाढदिवसासाठी त्याने महाबळेश्वरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये आधीच बुकिंग करून ठेवले होते. सियाला वाढदिवसाचे मोठे सरप्राइज देण्याची त्याची पूर्ण तयारी झाली होती. मात्र, तो २० जून उजाडण्यापूर्वीच, म्हणजेच १८ जून रोजी सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून दिले आणि त्याच्या प्रेमाचा विदारक अंत केला.(Ketan Agarwal death Case)

Ketan Agarwal Murder Case :  हत्येचा कट रचतानाचा ‘तो’ कॅफेमधील सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती!

एकीकडे केतन महाबळेश्वरच्या ट्रिपचे स्वप्न पाहत होता, तर दुसरीकडे सिया आणि चेतन केतनला संपवण्याची स्क्रिप्ट लिहीत होते. पुणे पोलिसांच्या हाती आता या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागला आहे. लोहगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी सिया आणि चेतन पुण्यातील एका कॅफेमध्ये एकत्र बसले होते. याच कॅफेमध्ये बसून त्यांनी केतनला लोहगडवर नेऊन दरीत कसे ढकलायचे, याचा संपूर्ण प्लॅन तयार केला होता. या कॅफेमधील दोघांचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पोलिसांच्या हाती आले असून, त्यामध्ये केतनची हत्या करण्यापूर्वी या दोघांमधील संशयास्पद हालचाली आणि आखला गेलेला कट स्पष्टपणे दिसत आहे.

Ketan Agarwal Murder Case : काय होती चेतनची पोलिसांना गुंगारा देण्याची ‘खेळी’?

केतन अगरवाल आणि सिया यांचे लग्न ठरले होते, मात्र सिया आणि चेतनच्या प्रेमात केतन अडसर ठरत असल्याने त्यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. १८ जून २०२६ रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास जेव्हा सिया आणि केतन लोहगडाकडे जाण्यासाठी निघाले, तेव्हा सियाने चेतनला मिस कॉल देऊन ते निघाल्याचा संकेत दिला. हा मिस कॉल मिळताच चेतनने एक मोठी खेळी केली. त्याने स्वतःच्या मोबाईलचा इंटरनेट डेटा बंद केला आणि आपला फोन पुण्याच्या मार्केट यार्डमधील आपल्या दुकानातील कामगार नीरज कुमार याच्याकडे सोपवला. स्वतःचे लोकेशन लोहगडावर ट्रेस होऊ नये म्हणून त्याने स्वतःचा फोन दुकानात ठेवला आणि कामगार नीरजचा मोबाईल स्वतःसोबत घेऊन तो लोहगडाकडे रवाना झाला.

हेदेखील वाचा

Comments are closed.