नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा निकाल, नराधम भीमराव कांबळे दोषी, काय शिक्षा होणार?
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्रदिनाच्या दिवशी साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापजनक पडसाद उमटले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्याचा निकाल आज (गुरुवारी दि. २५ जून) लागला आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली. आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस आर साळूंखे यांनी या प्रकरणाचा निकाल देत आहेत. या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे.
Nasrapur Case Verdict Updates: न्यायालयात काय घडलं?
नसरापूर हत्या प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळेला न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवले आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले. त्यापैकी दोन गुन्ह्यांमधे फाशीच्या शिक्षेची तरतुद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात १४ वर्षा़च्या कारावासाची शिक्षेची तरतूद असल्याची कोर्टाची माहिती आहे. तर यावेळी न्यायाधीशांनी आरोपी भिमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन विचारले की, तु तो प्रसंग आठव आणि तुच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे. त्यावर आरोपी भिमराव कांबळेने पुन्हा बनाव रचला आणि न्यायालयाला सांगितले की, ” मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तुला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती, असंही आरोपीने म्हटलं आहे. त्यानंतर न्यायाधीशांनी गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला म्हटले की “आता तु जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी”, न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भिमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले. गुन्हेगार ठरलेल्या भिमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद सुरु आहे. सरकारी वकिल युक्तीवाद करत आहेत आणि त्यांच्याकडून भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी करण्यात आली आहे.
भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकिय तपासणीत भिमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आलं असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं आहे. त्या लहान मुलीच्या अंगावर अठरा जखामा या आरोपीने लैंगिक अत्याचार करताना केल्या. समाजात मुली आणि महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र असे कृत्य केले तर भितीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपीने फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेले आहे.
Nasrapur Case Verdict Updates: नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक करण्यात आले. तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावण सुरू झाली.
Nasrapur Case Verdict Updates: इन कॅमेरा’ सुनावणी
नसरापूर अत्याचार प्रकरण संवेदनशील असल्याने या प्रकरणाची सुनावणी बंद दाराआड (इन कॅमेरा) झाली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पीडित बालिकेचे आई-वडील, आजी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ, डीएनए विश्लेषक यांच्यासह ५५ जणांची साक्ष नोंदवली. या खटल्यात सरकार पक्ष आणि बचाव पक्षाने अंतिम युक्तिवाद पूर्ण केला आहे.
नसरापूर प्रकरण: पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणाचा घटनाक्रम
१ मे २०२६ (संध्याकाळ) – नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय.
२ मे २०२६- पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले.
मे २०२६ चा पहिला आठवडा – शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय
तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले.
याच काळात – नसरापूर, भोर आणि परिसरात नागरिकांनी निषेध आंदोलने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
तपासादरम्यान – पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, ‘डीएनए’, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.
१६ मे २०२६ – अवघ्या सुमारे १५ दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे १ हजार २०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
२८ मे – न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.
जून २०२६ – सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली.
२० जून २०२६च्या सुमारास – दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू
झाले. सरकार पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली.
२५ जून २०२६ – न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याचे नियोजन करण्यात आले.
Nasrapur Case Verdict Updates: देशातील जलद खटल्यांची उदाहरणे
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण झाला आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही आठवड्यात तपास पूर्ण करून १ हजार २०० पानाचे आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. साक्षीदारांचे साक्ष नोंदविण्यात आल्याने आणि अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून याप्रकरणी आज शिक्षा सुनावलीत जाण्याची शक्यता आहे. देशात आजपर्यंत खून आणि बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात घटनेपासून शिक्षेपर्यंतचा प्रवास 55 दिवसात पूर्ण होण्याची ही दुसरीच घटना आहे. नसरापूर येथे १ मे २०२६ रोजी घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
भारतात बलात्कार आणि हत्या प्रकरणांमध्ये जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालये आणि फास्ट ट्रॅक यंत्रणा कार्यरत असली,तरी प्रत्येक प्रकरणाचा कालावधी वेगळा राहिला आहे.
उत्तर प्रदेशातील बहराईच येथील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणात सुमारे ५५ दिवसांत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची नोंद आहे.
बिहार आणि तेलंगणामधील काही प्रकरणांतही दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत निकाल लागल्याची उदाहरणे आहेत
भारतात ‘घटना ते शिक्षा’ या निकषावर सर्वांत जलद खटल्याची अधिकृत राष्ट्रीय नोंद किंवा मान्यता उपलब्ध नाही. त्यामुळे नसरापूर प्रकरणाला देशातील सर्वांत जलद खटला म्हणण्यापेक्षा, अत्यंत वेगाने सुनावणी पूर्ण झालेल्या उल्लेखनीय प्रकरणांपैकी एक असे म्हणावे लागेल..
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.