‘मी केतनला माझ्या अफेअरबद्दल अन् चेतनबाबत सगळं सांगितलं, तर त्याने मला…’, सिया गोयलची लोहगड प्

पुणे: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाला (ketan agarwal death) आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (chetan chaudhari) यांच्या चौकशीतून रोज नवे आणि थक्क करणारे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनचा खून हा कुठल्याही रागाच्या भरात किंवा अचानक झालेला नसून, त्यामागे अनेक दिवसांचे अतिशय थंड डोक्याने केलेले ‘क्रिमिनल प्लानिंग’ होते. तर एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सियाने केतनला तिच्या अफेअरबद्दल आणि चेतनबाबत सगळं सांगितलं होतं असा दावा तिने केला आहे.(ketan agarwal death)

Siya Goyal Confession : “मी प्रेमसंबंधांबद्दल सांगितलं होतं, पण तो ऐकायला तयार नव्हता”

चौकशीदरम्यान सियाने पोलिसांकडे एक वेगळाच दावा केला आहे. ती म्हणाली, “माझं आणि चेतनचं अफेअर आहे, हे मी केतनला स्पष्ट सांगितलं होतं. मला हे लग्न करायचं नाही आणि पळून जायचं आहे, असंही मी त्याला वारंवार सांगितलं होतं. पण केतन लग्न रद्द करण्यास तयार नव्हता. ‘आता लग्न मोडू शकत नाही, माझं कुटुंब खूप श्रीमंत आहे, तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू’ असं केतनने मला म्हटलं होतं.”

सियाच्या घरचे चेतनसोबतच्या नात्याच्या पूर्णपणे विरोधात होते. केतन हा गर्भश्रीमंत घरचा असल्याने तिच्या घरच्यांचा या लग्नासाठी सियावर प्रचंड दबाव होता. सिया आणि चेतन या दोघांनाही अमली पदार्थांचे व मद्यपानाचे व्यसन होते. तिच्या याच सवयींमुळे तिचे पालक चिंतेत होते आणि म्हणूनच तिचे लग्न घाईघाईत लावून देण्याचा त्यांचा विचार होता.

Siya Goyal Confession : खुनासाठी ठरला होता ‘स्पेशल सिग्नल’!

पोलीस तपासात सियाने गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा काटा काढण्यासाठी तिने आणि चेतनने आधीच एक सांकेतिक खूण (सिग्नल) ठरवली होती. योजनेनुसार, योग्य वेळ येताच सियाने केतनच्या समोर खाली वाकायचे होते, जेणेकरून मागे उभ्या असलेल्या चेतनला केतनला दरीत ढकलणे सोपे जाईल. त्या दिवशी दरीजवळ पोहोचताच सियाने तो ‘सिग्नल’ दिला, ती खाली वाकली आणि मागून आलेल्या चेतनने केतनला थेट दरीत ढकलून दिले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण क्रूर कटाची मुख्य सूत्रधार खुद्द सिया गोयल हीच होती.

Siya Goyal Confession : ‘डेथ पॉईंट’ निश्चित करून आखले होते ३ प्लॅन्स!

तपासात समोर आलेली सर्वात चक्रावून टाकणारी बाब म्हणजे, केतनला संपवण्यासाठी या दोघांनी एक नाही तर तब्बल तीन प्लॅन्स तयार ठेवले होते. ३१ मे रोजी सियाने केतनसोबत लोहगडला जाऊन ‘डेथ पॉईंट’ निश्चित केला होता. त्यानंतर १४ जून रोजी तिने केतनला दरीत ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला, पण सुदैवाने एका झाडाचा आधार मिळाल्याने केतन वाचला. तेव्हा सियाने “तुला सापापासून वाचवण्यासाठी धक्का दिला,” असा बनाव रचून विषय संपवला. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर १८ जून रोजी दुसरा प्लॅन अमलात आणून केतनची हत्या करण्यात आली. १८ जूनलाही केतन वाचला असता, तर त्याला थेट रस्ते अपघातात मारण्याची तिसरी योजना सियाने आधीच आखून ठेवली होती.

Siya Goyal Confession :  ओळख लपवण्यासाठी घातला होता मास्क

हत्येच्या दिवशी आरोपी किती तयारीनिशी आले होते, याची साक्ष लोहगडच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक धीरज जाधव याने दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी चेतन पूर्ण कपडे आणि तोंडाला मास्क लावून आला होता. त्याने तिकिटाचे २५ रुपये नंतर देतो असे सांगून ‘व्यायामासाठी आलोय’ अशी बतावणी केली, तर सियानेही ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली तिकिटावरून हुज्जत घातली होती.

हेदेखील वाचा

Comments are closed.