भारत विरुद्ध आयर्लंडमधील टी 20 मालिकेच्या वेळापत्रकात मोठा बदल, महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 यास कारणीभूत
भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार असून शुक्रवारपासून (२६ जून) याची सुरूवात होणार आहे, मात्र त्याआधी वेळापत्रकामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. बुधवारी उशिरा क्रिकेट आयर्लंडने याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की हे सामना आता त्यांच्या नियोजित विळेपेक्षा एक कास आधी सुरू होती. यापूर्वी भारत विरुद्ध आयर्लंड टी२० सामने स्थानिक वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होणार होते, म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होणार होते. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता हे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहेत. मालिका सुरू होण्यास एक दिवस बाकी असताना हा बदल का केला गेला, हे जाणून घेऊ.
यजमान क्रिकेट बोर्डला सामन्यांची वेळ बदलावी लागली कारण आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे सामनेही त्याच वेळी खेळले जाणार आहेत. तसे पाहिले तर भारताचे टी२० सामने सहसा संध्याकाळी ७ वाजता सुरू होतात, मात्र आता बऱ्याच काळानंतर प्रथमच नाणेफेक संध्याकाळी ५.३० वाजता होईल आणि सामना संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल. याचे कारण असेही आहे की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिली टी२० विश्वचषकाचा सामना देखील संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.
Comments are closed.