थोडं थांबा, ठाकरेंचे 14 आमदार आमच्यासोबत येतील, शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की…; गुलाबराव पाटल
गुलाबराव पाटील ऑपरेशन टायगरवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर 3.0’ ची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर आता तब्बल 14 आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “14 पेक्षा जास्त आमदार सोबत येतील, थोडं थांबा,” असा थेट इशारा देत त्यांनी ठाकरे गटाच्या चिंतेत आणखी वाढ केली आहे.
Gulabrao Patil on Operation Tiger: शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की…
‘ऑपरेशन 3.0 च्या संदर्भातील प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “ऑपरेशन 3.0 ला सुरुवात झाली आहे. थोडं थांबा, 14 पेक्षा जास्त आमदार सोबत येतील. एकनाथ शिंदे बोलत नाहीत फक्त दाढीवर हात फिरवतात. हे स्वतः उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी कबूल केलं आहे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. जेव्हा एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवतात त्यावेळी ऑपरेशन टायगर सक्सेस होते, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.”
Gulabrao Patil on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टोला
6 फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले असून ते उद्यापासून पुढील तीन दिवस संबंधित मतदारसंघात दौरे आणि मेळावे घेणार आहेत. या दौऱ्याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला. गुलाबराव पाटील म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी फिरलेच पाहिजे, मुलाने केले नाही तर बापाने ते केलेच पाहिजे.”
Gulabrao Patil on Sanjay Dina Patil: खासदार संजय दिना पाटलांना सल्ला
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या वादावर गुलाबराव पाटील यांनी संजय दिना पाटलांना खडेबोल सुनावले. गुलाबराव पाटील म्हणाले की, “असं व्हायला नाही पाहिजे, पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे आरशाला दगड मारू नये. वादविवाद होत असतात, आमचेही होतात. पण याचा अर्थ मारामारी करणे, शिवीगाळ करणे असा होत नाही. यापुढे असं काही होऊ नये असा सल्ला त्यांना देईन. क्षमस्व, वीरस्य भूषणम् असं म्हणत त्यांनी सॉरी म्हणायला काय हरकत आहे? असे त्यांनी म्हटले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.