उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

आपणाला घरातली मोठी मंडळी उभं राहून पाणी पिऊ नये असे कायम सांगतात. अनेकांना यामागे अंधश्रद्धा हे कारण वाटतं. त्यामुळे ही गोष्टी टाळली जाते. परंतू तज्ज्ञाच्या मते उभं राहून पाणी प्यायल्याने आरोग्याला हानी पोहचू शकते. आजच्या लेखात आपण उभे राहून पाणी प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊयात.

उभं राहून पाणी प्यायल्याने लहात भागत नाही आणि पुन्हा पुन्हा प्यावेसे वाटते. त्यामुळे पाणी कायम बसून पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
तुम्ही जेव्हा उभं राहून पाणी पिता तेव्हा पचनक्रियेवर परिणाम होतो. उभं राहून पाणी प्यायल्यास पाणी वेगाने खाली जाते, ज्यामुळे पोटात गडबड होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो.
बसून पाणी प्यायल्यास शरीरात पाणी चांगले फिल्टर होते. मात्र, उभे असताना पाणी प्यायल्याने ते गाळल्याशिवाय वेगाने पोटाच्या खालच्या भागात जाते, ज्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.
उभं राहून पाणी प्यायल्यामुळे शरीरातील द्रव्यांचा समतोल बिघडू शकतो आणि सांध्यांमध्ये द्रव जमा होऊन कालांतराने सांधेदुखी किंवा संधिवात चा त्रास सुरू होऊ शकतो.
उभं राहून पाणी पिण्याची सवय फुफ्फुसावरही वाईट परिणाम करतं.जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता तेव्हा ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो, ज्याचा फुफ्फुसापासून हृदयावरही परिणाम होतो.

हेही वाचा – लाकूड, प्लास्टिक की स्टील, कोणता चॉपिंग बोर्ड सर्वात सुरक्षित

Comments are closed.