रमेश दामले स्मृती करंडक जुनियर, सब-ज्युनियर, वरिष्ठ गट जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत त्विशा दिक्षितची लक्षवेधी कामगिरी

पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटना (पीडीएएए) यांच्या वतीने आयोजित रमेश दामले स्मृती करंडक जुनियर, सब-ज्युनियर, वरिष्ठ गट जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत हार्मनी ॲक्वेटिक क्लबच्या त्विशा दिक्षित हिने लक्षवेधी कामगिरी नव्या विक्रमांसह चार गटात विजेतेपद संपादन केले. टिळक जलतरण तलाव, डेक्कन जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 200मी फ्री स्टाईलमध्ये 16 वर्षाखालील मुलींच्या गटात त्विशा दिक्षित हिने(02.14.13से) वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.  त्विशाने 2025 मधील दिप्ती टिळक(02:15.19से)चा विक्रम मोडला.

याच प्रकारात महिला खुल्या गटात त्विशा दिक्षित(02.14.13से) हिने अव्वल क्रमांक पटकावला. यात देखील त्विशाने  2017मधील साध्वी धुरी(02:20.52से)हिचा विक्रम मोडीत काढला. 800मी फ्री स्टाईल मध्ये 16 वर्षाखालील मुलींच्या गटात त्विशा दिक्षितने 09.42.87 सेकंद वेळ नोंदवून आणखी एका विजेतेपदाचा मान पटकावला. या गटात देखील तिने 2007 मधील आरती घोरपडे (09:58.26से)चा विक्रम मोडला. तर, याच प्रकारात खुल्या महिला गटात  त्विशाने 09.42.87 सेकंद वेळ नोंदवत प्रथम स्थान मिळवले.  या गटात तिने 2007 मधील आरती घोरपडे (09:58.26से)चा विक्रम मोडला.

9 वर्षाखालील मुलांच्या गटात डेक्कन जिमखानाच्या अर्जुन कुरुडकरने 200मी फ्री स्टाईलमध्ये 03.12.10सेकंद वेळ नोंदवून पहिले स्थान पटकावले. तर, 100मी बॅकस्ट्रोकमध्ये अर्जुन कुरुडकरने 01.32.72 सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यामध्ये अर्जुनने  2025मधील विहान मंत्री(01:35.47से)चा विक्रम मोडला.100मी बॅकस्ट्रोकमध्येहार्मनी ॲक्वेटिक क्लबच्या काव्या रिसबूडने   14 वर्षाखालील मुलींच्या गटात (01.14.07से) तर,  वरिष्ठ महिला गटात तिने 01.14.07से) या दोन्ही गटात विजेतेपद पटकावले. याचबरोबर श्रीलेखा पारीख हिने 50मी बटरफ्लायमध्ये 18 वर्षाखालील व खुला महिला गट या गटात विजेतेपद मिळवले. आर्यवीर पाटील याने 200मी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात 18 वर्षाखालील मुले व वरिष्ठ पुरुष या दोन्ही गटात विजेतेपद मिळवले.

निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार:50मी बॅकस्ट्रोक(6 वर्षाखालील मुले): 1. आरव घाटगे(56.62से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 2. मानव बच्चाव(59.53से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 3. अगस्त्य कुलकर्णी(01.01.21से, डिव्हाईन स्विमिंग अकादमी);50मी बॅकस्ट्रोक(6 वर्षाखालील मुली): 1. आनंदी पवार(54.81से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), ,2. जिजा वैद्य(58.84से, चॅम्पियन ॲक्वेटिक क्लब), 3. इनाया कुकडे(01.00.18से, बिशप्स को एड स्कूल);200मी फ्री स्टाईल(16 वर्षाखालील मुले): 1. मयंक बांडे(02.06.00से, क्रीडा प्रबोधिनी), 2. वरद मारणे(02.10.19से, डेक्कन जिमखाना), 3. अर्जुन नाईक(02.10.62से,

ब्लूवॉटर स्पोर्ट्स अकादमी);200मी फ्री स्टाईल(16 वर्षाखालील मुली): 1. त्विशा दिक्षित(02.14.13से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 2. अनन्या बिरारी(02.32.97से, क्रीडा प्रबोधिनी), 3. इरा कपाडिया(02.38.87से, एसएम ॲक्वेटिक्स);200मी फ्री स्टाईल(पुरुष खुला गट): 1. अर्णव भाडेकर(02.03.50से, डेक्कन जिमखाना), 2. वरद मारणे(02.10.19से, डेक्कन जिमखाना), 3. ईशान माझिरे(हार्मनी ॲक्वेटिक क्लब);200मी फ्री स्टाईल(महिला खुला गट): 1. त्विशा दिक्षित(02.14.13से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 2. अनुष्का विजापूर(02.24.94से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 3. डॉली पाटील(02.29.34से,

क्रीडा प्रबोधिनी);200मी फ्री स्टाईल(9 वर्षाखालील मुले): 1. अर्जुन कुरुडकर(03.12.10से, डेक्कन जिमखाना), 2. आरव पाटील(03.18.72से), 3. ऋषांक माळी(03.24.75से, डेक्कन जिमखाना);100मी बॅकस्ट्रोक(14 वर्षाखालील मुली): 1. काव्या रिसबूड(01.14.07से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 2. कृष्णा दाते(01.18.96से, शार्क ॲक्वेटिक क्लब), 3. इरा एकबोटे(01.22.38से,

स्विफ्ट फिनस्विम क्लब);100मी बॅकस्ट्रोक(16 वर्षाखालील मुले): 1. अर्णव कडू(01.01.19से, डेक्कन जिमखाना), 2. वरद कदम(01.06.13से, चॅम्पियन ॲक्वेटिक क्लब), 3. वंश पालरेचा(01.09.79से, शार्क ॲक्वेटिक क्लब);100मी बॅकस्ट्रोक(वरिष्ठ महिला गट): 1. काव्या रिसबूड(01.14.07से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 2. भक्ती वाडकर(01.14.75से, क्रीडा प्रबोधिनी), 3. श्रिया खवले(01.19.56से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब);100मी बॅकस्ट्रोक(9 वर्षाखालील मुले): 1. अर्जुन कुरुडकर(01.32.72से, डेक्कन जिमखाना), 2. विराज पाटील(01.33.53से, पेगासिस हेल्थ क्लब), 3. ऋषांक माळी(01.41.75से, डेक्कन जिमखाना);200मी ब्रेस्टस्ट्रोक(16 वर्षाखालील मुले); 1. अर्णव कडू(02.33.31से, डेक्कन जिमखाना), 2. ईशान तिडके(02.45.93से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 3. निरंजन यादव(02.48.75से,

क्रीडा प्रबोधिनी);200मी ब्रेस्टस्ट्रोक(16 वर्षाखालील मुली): 1. झील मलानी(02.56.16से, डेक्कन जिमखाना), 2. तनया यादव(03.05.16से, स्विफ्ट फिनस्विम क्लब), 3. अद्विती सावंत(03.16.40से, डेक्कन जिमखाना);200मी ब्रेस्टस्ट्रोक(18 वर्षाखालील मुले): 1. आर्यवीर पाटील(02.32.96से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 2. आयुष गायकवाड(02.35.00से, डेक्कन जिमखाना), 3. अर्जुन साठे(02.50.69से, डेक्कन जिमखाना);200मी ब्रेस्टस्ट्रोक(वरिष्ठ पुरुष): 1. आर्यवीर पाटील(02.32.96से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 2. आयुष गायाकवाड(02.35.00से, डेक्कन जिमखाना), 3. ईशान तिडके(02.45.93से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब);50मी

बटरफ्लाय(18 वर्षाखालील मुली): 1. श्रीलेखा पारीख(30.50से, ब्लूवॉटर स्पोर्ट्स अकादमी), 2. मैथिली चिटणीस(33.54से, चॅम्पियन ॲक्वेटिक क्लब), 3. श्रिया खवले(33.85से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब);50मी
बटरफ्लाय(खुला महिला गट): 1. श्रीलेखा पारीख(30.50से, ब्लूवॉटर स्पोर्ट्स अकादमी), 2. साराक्षी दांगट(31.77से, डेक्कन जिमखाना), 3. समृद्धी जाधव(34.75से, क्रीडा प्रबोधिनी);800मी फ्री स्टाईल(16 वर्षाखालील मुली): 1. त्विशा दिक्षित(09.42.87से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 2. अनन्या बिरारी(11.17.66से, क्रीडा प्रबोधिनी), 3. ध्वजा जैन(11.30.56से, डेक्कन जिमखाना);800मी फ्री स्टाईल(खुला महिला गट): 1. त्विशा दिक्षित(09.42.87से, हार्मनी ॲक्वेटिक क्लब), 2. दिक्षा यादव(09.53.47से, क्रीडा प्रबोधिनी), 3. कैजा शंकर(10.05.55से, चॅम्पियन ॲक्वेटिक क्लब).

Comments are closed.