ऑपरेशन सिंदूरमधील 6 हुतात्म्यांची नावे समोर आली आहेत.
राष्ट्रीय युद्ध स्मारकात मिळाले स्थान
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर“ला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटला आहे. सैन्याने आता पहिल्यांदाच ऑपरेशनदरम्यान हौतात्म्य पत्करावे लागलेल्या 6 सैनिकांची नावे सार्वजनिक केली आहेत. सैन्याच्या ऑपरेशनमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या संख्येत दहशतवादी मारले गेले होते आणि कमीतकमी 9 दहशतवादी अ•s उद्ध्वस्त करण्यात आले होते.
राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या संकेतस्थळावर आता या ऑपरेशनमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या 6 सैनिकांची नावे नमूद करण्यात आली आहेत. याचबरोबर नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकातही त्यांच्या नावाला स्थान देण्यात आले आहे. या हुतात्म्यांमध्ये सुबेदार मेजर पवन कुमार (हेडक्वार्टस 10 इन्फ्रंट्री ब्रिगेड), रायफलमॅन सुनील कुमार (जम्मू-काश्मीर लाइट इन्फ्रंट्री वीर चक्र), लान्स नायक दिनेश कुमार (5 फील्ड रेजिमेंट), एव्हिशन टेक्निशियल मूद मुरलीनायक (851 लाइट रेजिमेंट), हवालदार सुनील कुमार सिंह (237 फील्ड वर्कशॉप कंपनी) आणि सार्जंट सुरेंद्र कुमार (वायुपदक, 39 विंग) यांचे नाव सामील आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्धस्मारकाच्या 3 डी भिंतीवर या हुतात्म्यांची नावे कोरण्यात आली आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी लोक या शुरवीरांच्या गाथा जाणून घेऊ शकणार आहेत.
या 6 हुतात्म्यांमध्ये भूदलाचे 5 सैनिक आणि वायुदलाचा एक सार्जंट सामील आहे. रायफलमॅन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र आणि सार्जंट सुरेंद्र कुमार यांना वायुपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. 6 जणांपैकी बहुतांश सैनिक जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशनदरम्यान हुतात्मा झाले होते.
6 मे 2025 च्या रात्रीपासून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरु केले होते. यानंतर 4 दिवसांपर्यंत सीमेवर तणाव राहिला होता. पाकिस्तानने हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याची क्षेपणास्त्रs आणि ड्रोन आकाशातच नष्ट करण्यात आली होती. अखेरीस पाकिस्तानला युद्धविरामासाठी विनवणी करावी लागली आणि मग तणाव कमी करण्यात आला होता.
Comments are closed.